'सखे गं साजणी' चित्रपटाची निर्मिती प्रार्थना बेहेरेची... चित्रपटात कलाकार नेमके कोण दिसणार?

प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसचा ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या रेडबल्ब स्टुडिओ प्रस्तुत 'सखे गं साजणी'च्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये दिसणारे कलाकार नक्की आहेत तरी कोण अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे 'सखे गं साजनी' या नव्या चित्रपटाच्या पोस्टरची. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊस मार्फत हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने यापूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने त्यांच्या 'रेडबल्ब प्रॉडक्शन' हाऊसचा नवा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर शेअर करत चित्रपटाची अधिकची माहिती दिली आहे. समोर आलेल्या पोस्टरवरील पाठमोऱ्या उभ्या असलेल्या कलाकारांनी अर्थातच चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे. नेमका हा चित्रपट काय आहे, यांत कोण असणार आहे हे समोर आलेल्या पोस्टरवरून स्पष्ट होत नाही त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये एकूणच याची उत्सुकता रंगली आहे.

या समोर आलेल्या 'सखे गं साजणी' चित्रपटाच्या पोस्टरने खरंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. समुद्र किनारी हे तीन मित्र म्हणजेच दोन मुली आणि एक मुलगा पाठमोरे उभे असून त्यांनी हाताने हार्ट ईमोजी केलेला पाहायला मिळत आहे. चित्रपटातील हे तीनही कलाकार पाठमोरे असल्याने त्यांचे चेहरे दिसत नाही. अर्थात या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अस्पष्ट आहे. शिवाय कथा नेमकी काय असणार हे देखील गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'सखे गं साजणी' चित्रपट असणार आहे.

'रेडब्लब स्टुडिओ' प्रस्तुत, दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘सखे गं साजणी’ हा नवाकोरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत यांनी सांभाळली आहे. प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर या सिनेविश्वातील लोकप्रिय जोडीच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे हा नवाकोरा सिनेमा रसिकांच्या भेटीस येत आहे. तर सहनिर्माते म्हणून अभिजीत खांडकेकर आणि अभिषेक दिलीप वाकचौरे यांनी बाजू सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतकार विजय भटे यांनी पेलवली आहे. आता समोर आलेल्या या पोस्टरवरून चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? चित्रपटाची कथा नेमकी काय असणार? याची उत्सुकता आहे आणि लवकरच या उत्सुकतेला पूर्णविरामही मिळणार आहे.
Comments
Add Comment

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced : प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, १४ वर्षाच्या सुखी संसारानंतर जोडप्याने घेतला काडीमोड

मुंबई : अभिनेता विजयेंद्र कुमेरिया (Vijayendra Kumaria) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी समोर आली. "नागिन" फेम

एक स्त्री, एक सत्य आणि एक लढा! अभिषेक कंवर दिग्दर्शित ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित !

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आणि उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी

Kalyani Sadanand : अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका यांनी

Kiara And Siddharth Second Child : 'कुणीतरी येणार येणार गं...' कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!

मुंबई : बॉलिवूडचे लाडके जोडपे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth Malhotra) यांच्या घरी

यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos...

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल यामी गौतम आणि आदित्य धर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.