Nishikant Dubey : महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंचा 'ठाकरे बंधूंवर' हल्लाबोल

बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर...


नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. हिंदी भाषकांना मारताय, उर्दू बोलणाऱ्यांना मारुन दाखवा, असं आव्हान निशिकांत दुबे यांनी दिले. तसेच मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत. दहशतवाद्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, हे हिंदीवरुन अत्याचार करतायत, "आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. महाराष्ट्राबाहेर चला. तुम्ही जर बॉस आहात, तर बिहारला चला. उत्तर प्रदेशला चला, तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू", अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी ठकरे बंधूंवर केली. निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना होत असलेल्या मारहाणीवर भाष्य केले. त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना माहीममध्ये जाऊन उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असे आव्हानही दिले.




मनपाच्या निवडणुकांसाठी घाणेरडं राजकारण सुरु


आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे. निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रीयनांविरुद्ध गरळ ओकल्याचे पाहायला मिळाले. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं निशिकांत दुबे म्हणाले. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला.




तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात -निशिकांत दुबे


तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. "तुम्ही काय म्हणत आहात की, मराठी बोलावं लागले?  कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. टाटाने तर पहिला कारखाना बिहारमध्ये बनवला. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुमच्याकडे कोणता उद्योग आहे?", अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी केली. "खाणी आमच्याकडे आहेत. झारखंडकडे आहेत. मध्य प्रदेशकडे आहेत. छत्तीसगडकडे आहेत. ओडिशाकडे आहेत. तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिलायन्सनेही रिफायनरी गुजरातमध्ये सुरू केली आहे. सर्व उद्योग मग सेमी कंडक्टरचा उद्योगही गुजरातकडे येत आहेत", असे निशिकांत दुबे मराठी विरुद्ध हिंदी वादावर बोलताना म्हणाले.




बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर...


बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही खरंच वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आमच्या पैशावर जगतायत. सगळे उद्योग गुजरातमध्ये येतायत. हिंमत असेल तर तुम्ही तेलगू लोकांना पण मारा, असं निशिकांत दुबे म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे, असं निशिकांत दुबेंनी सांगितले. निशिकांत दुबेंच्या या आव्हाननंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा