रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाची जागा एमएमआरडीएच्या ताब्यात

घाटकोपर येथील प्रकल्पास वेग येणार


मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास योजनेसाठी घाटकोपर येथील ८४,६३८.७२ चौ. मीटर जागेचा ताबा अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मिळाला आहे. लवकरच आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे.


त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पास वेग येणार आहे. पूर्वमुक्त मार्गाच्या घाटकोपर ते ठाणे अशा विस्तारीकरणात रमाबाई आंबेडकरनगरातील झोपड्या बाधित होणार आहेत. बाधित झोपड्यांसह संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएकडून संयुक्त भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी या दोन्ही सरकारी यंत्रणांमध्ये संयुक्त करारही झाला आहे. झोपु प्राधिकरणाकडे परिशिष्ट -२ तयार करत झोपड्या पाडत भूखंड रिकामे करुन एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आहे.


तर पुनर्वसित इमारती बांधत १४ हजारांहून झोपडीधारकांच्या प्रत्यक्ष पुनर्वसनाची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाकडून पात्रता निश्चित करत मोठ्या संख्येने झोपड्यांचे पाडकाम पूर्ण करण्यात आले आहे.


दरम्यान झोपु योजनेसाठी लागणारी रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील झोपड्यांनी व्यापलेल्या जागेपैकी ८४,६३८.७२ चौ. मीटर जागा महसूल आणि वन विभागाच्या अखत्यारितील होती. तर ७१,७३८.७३ चौ. मीटर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहे.


त्यामुळे या जागा एमएमआरडीएकडे वर्ग करण्यासंबंधीचे अधिकृत दस्तऐवज राज्य सरकारकडून ९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अधिकृत पत्रानुसार ८४,६३८.७२ चौ. मीटर जागेचा ताबा एमएमआरडीएला मिळाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता काही अंशी पहिल्या टप्याला गती प्राप्त झाल्याने नागरिकांध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म