ठाकरे बंधूंची युती होणार नाही? राज ठाकरेंच्या आदेशाने चर्चांना 'ब्रेक'? संभ्रम वाढला!

मुंबई: त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर, आता त्यांच्या युतीबद्दलचा संभ्रम वाढला आहे. ५ जुलै रोजी वरळीतील NSCI डोममध्ये 'संयुक्त मराठी जल्लोष मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी 'एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,' अशी भूमिका मांडली. मात्र, राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतीही थेट घोषणा केली नाही. त्यातच, आता राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीसंदर्भात मला विचारल्याशिवाय कोणीही बोलू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठा शिवसेना (ठाकरे गट) सोबतच्या युतीसंदर्भात माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलू नये, असे निर्देश दिले आहेत. "कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे," असे राज ठाकरे यांनी सांगितल्याने दोन्ही पक्षांच्या युतीबद्दल नवा संभ्रम निर्माण झाला आहे.



उद्धव ठाकरे उत्सुक, पण राज ठाकरे सावध?


वरळीतील व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चांना जोर पकडला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेकदा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी यावर फारसे भाष्य करणे टाळले.



राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार!


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले. मात्र, भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत त्यांनी दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी, राज ठाकरे यांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे.


मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी, मनसे आणि ठाकरे गटाची खरोखरच युती होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता या चर्चांना तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे, असे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य