Gold Silver news marathi: सोने स्वस्त झाले पण चौथ्यांदा चांदी स्थिरच 'इतक्या ' रूपयांनी सोने घसरले जाणून घ्या जागतिक कारणे !

प्रतिनिधी: शेअर बाजारात घसरण सुरू होत असतानाच आज सोन्यात देखील घसरण झाली आहे. प्रामुख्याने युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांवर अतिरिक्त १०% टेरिफ आकारण्याचे ठरल्याने बाजारात दबाव निर्माण झाला होता. याचप्रकारे युएस बाजारात किरकोळ काल घसरण झाली होती. कालप्रमाणे आजही डॉलरमध्ये वाढ झाल्याने सोन्याला सपोर्ट लेवल प्राप्त झाली.परिणामी सोन्यात आज घसरण झाली आहे. बाजारातील अस्थिरतेचा फटका सोन्यात बसला. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफवरील एका वक्तव्यानंतर दबाव निर्माण झाला कॉपर आयातीवर ५०% टेरिफ लावण्याच्या निर्णयनांतर धातूंवर दबाव निर्माण झाला. 'गुडरिटर्न्स' संकेत स्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ६६ अंकांने घसरण झाली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ६० रूपये घसरण झाली. १८ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४९ रुपयांची घसरण झाली.

त्यामुळे २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ९८१८ रूपये आहे तसेच २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९०००, व १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७३६४ रूपये आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ६६० रूपयांनी घसरत ९८१८० रूपयांवर, २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ६०० रुपयांनी घसरत ९०००० रूपयांवर व १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४९० रूपयांनी घसरत ७३६४० रूपयांवर पोहोचली आहे.

दुपारपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.६०% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये ०.५१% घसरण झाल्याने एमसी एक्सवरील दरपातळी ९५९७९.०० रूपयांवर पोहोचली आहे. आज युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३७% घसरण झाली आहे. देशभरातील मुंबई, पुण्यासह बहुतांश शहरात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९८१८ रूपयांवर कायम आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९००० रूपयांवर व १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७४२५ रुपयांवर आहे.

युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०% टेरिफ अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा सोन्याला प्रामुख्याने फटका बसला. मुख्यतः डॉलर वधारल्याने सोन्याच्या मागणीतही घट झाली होती. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात इत क्यात शक्य नसली तरी प्रामुख्याने अनपेक्षित पेरोल डेटात अमेरिकेने दुपटीने प्रगती दर्शविली असल्याने बाजारातील सोन्यावर दबाव सुरु होता. सततच्या चढउतारीनंतर काल सोन्याच्या दरात वाढ झाली आज तेच सोने पुन्हा घसरले आहे.

चांदीच्या दरात चौथ्यांदा स्थिर!

चांदीच्या दरात स्थिरता आल्याने सतत चढउतार असलेल्या चांदीच्या दरात मात्र सलग चौथ्यांदा स्थिरताच आहे. प्रामुख्याने डॉलरच्या तुलनेत रूपयात गेल्या आठवड्यात वधारला असल्याने चांदी किंमतीला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली. गेल्या दोन आठवड्यात घसरत असलेला डॉलर कालपासून वाढल्याने पुन्हा चांदीत हालचाल होऊ शकते.सोन्याच्या व चांदीच्या दरातील भारतीय किंमत आगामी काळातील डॉलर व मागणीवर अवलंबून असेल तत्पूर्वी देशांतर्गत घटत असलेल्या मागणीचा परिणामही चांदीच्या दरात दिसून आला. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीचे दर प्रति ग्रॅम ११० रूपयांवर कायम आहेत.चांदीची किंमत ११०००० रूपये प्रति किलो दरावर स्थिरावली आहे. चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात (Silver Future Index) यामध्ये आज कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे चांदी पातळी ३६.७३ प्रति औंसवर कायम आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीचा निर्देशांक ०.२३% घसरत १०७७४०.०० रूपयांवर पोहोचला आहे.
Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा