उद्धव ठाकरे गटाला भाजपाचा मोठा दणका, कोकणातील नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या पक्षातून त्या पक्षात उडी मारत असताना दुसरीकडे भाजपने एक अत्यंत महत्त्वाची खेळी केली आहे. भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच मोठे खिंडार पाडले आहे. मालवण नगरपालिकेतील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांच्यासह १० प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळतंय.

ठाकरे गटाला कोकणात धक्का


मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला कोकणात जबरदस्त धक्का दिला आहे. आज मालवणमधील ठाकरे गटाचे काही महत्त्वाचे नेते मुंबईतील भाजपच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात भाजपमध्ये सामील झाले. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी



  • मंदार केणी – माजी नगराध्यक्ष

  • यतीन खोत – माजी नगरसेवक, बांधकाम सभापती

  • दर्शना कासवकर – माजी नगरसेविका, आरोग्य सभापती

  • भाई कासवकर – शाखा प्रमुख

  • नंदा सारंग – महिला उपशहर प्रमुख

  • नितीन पवार – शाखा प्रमुख

  • सई वाघ – शाखा प्रमुख

  • अमन घोडावले – उपशाखा प्रमुख

  • संजय कासवकर – शाखा प्रमुख

  • सेजल परब – माजी नगरसेविका


यावेळी पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांनी रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. “खऱ्या अर्थाने अडीच वर्षांत रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. त्याठिकाणी जे काम त्यांनी केले, त्यामध्ये आम्हाला कधीच विरोधी पक्षाची वागणूक दिली नाही. मालवण शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्याचा आताही विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे. पर्यटनदृष्ट्या आम्हाला मालवणचा विकास व्हावा यासाठीच आज आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहोत.”

सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता


भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण यांचं कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. सध्या ही योजना यशस्वी होताना दिसत आहे. मालवणमधील या मोठ्या पक्षबदलामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या पक्षप्रवेशाचा ठाकरे गटात काही परिणाम होतो का, हे पाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन