सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला एक वर्षाची शिक्षा


बंगळुरू : सोन्याच्या तस्करीत थेट सहभागी असल्याप्रकरणी कानडी अभिनेत्री रान्या रावला दोषी ठरवण्यात आले आहे. रान्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. हा आदेश परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायदा (COFEPOSA) सल्लागार मंडळाने दिला आहे. रान्या रावसह इतर दोन आरोपींनाही एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा भोगत असतानाच्या काळात तिन्ही आरोपींना जामिनासाठी अर्ज करता येणार नाही, असेही निकालात नमूद आहे. यामुळे तिन्ही आरोपींना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे.


रान्याने माणिक्य या चित्रपटात सुदीपसोबत साकारलेली भूमिका गाजली होती. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून रान्याने काम केले होते. पण सोन्याच्या तस्करीत पकडली गेल्यामुळे रान्याचे करिअर संकटात सापडले आहे. रान्या रावला याच वर्षी ३ मार्च रोजी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली होती. रान्या वारंवार परदेशी जात येत होती. यामुळे तिच्या परदेश दौऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अखेर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सापळा रचून रान्याला अटक केली. रान्याला जेव्हा अटक झाली तेव्हा ती दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बंगळुरूला आली होती.


रान्याने कपड्यांमधून सोनं लपवलं होतं. पण तपासणीत रान्याकडे असलेलं तस्करीचं सोनं पकडलं गेलं. रान्याचे वडील रामचंद्र राव हे एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे रान्या प्रत्येकवेळी परदेशातून आल्यावर वडिलांचे नाव सांगून तपासणी हुशारीने टाळत होती. पण महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईमुळे रान्याचे बिंग फुटले. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) रान्या रावविरुद्ध ईसीआयआर दाखल केला होता. रान्या विरोधात ईडीने ४ जुलै २०२५ रोजी कारवाई केली होती. बंगळुरूतील व्हिक्टोरिया लेआउटमधील एक घर, अर्कावती लेआउटमधील एक भूखंड, तुमकुरमधील एक औद्योगिक जमीन आणि अनेकल तालुक्यातील शेती जमीन जप्त करुन ईडीने कारवाई केली. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ३४.१२ कोटी रुपये आहे.



Comments
Add Comment

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून

Thane News: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, गरबा आणि रास दांडिया खेळण्यासाठी वेळेमध्ये केली वाढ; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

ठाणे: गरबा आणि रास दांडियाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रीचे सध्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य

विजयादशमी 2026: जाणून घ्या रावण दहनाचा शुभ मुहूर्त, पूजा आणि या सणाशी संबंधित ५ महत्त्वाच्या गोष्टी

सनातन धर्मात असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा पवित्र सण अत्यंत

एक स्त्री कशी असते हे समजलं... 'रणबाली' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रश्मिकाने शेअर केली खास पोस्ट

टॉलिवूडची लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा बहुचर्चित पीरियड ॲक्शनपट