Vidhanbhavan : मध्यरात्री विधानभवनाबाहेर जोरदार राडा, आव्हाडांची आक्रमक भूमिका

मुंबई: विधानभवनात गुरूवारचा दिवस हा आमदार पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादामुळे चांगलाच गाजला. दिवसभर हाच मुद्दा सुरू होता. मात्र मध्यरात्रीही विधानभवनाच्या बाहेर पुन्हा एकदा मोठा राडा पाहायला मिळाला.


विधानभवनात गुरूवारी राडा झाल्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकल साठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.


 


जितेंद्र आव्हाड म्हणणं होतं की रात्री देशमुख यास सोडून देतो असं सांगितले होते पण अटक करत असल्याने अचानक विधानभवन येथे आंदोलन सुरू केले.  एकीकडे आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांनी नितीन देशमुखला बसवलेल्या कारसमोर आंदोलन करत असतानाच अचानक त्याला दुसऱ्या कारमध्ये बसवलं. या गोंधळादरम्यान आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते या दुसऱ्या गाडीसमोर आंदोलन करण्यासाठी उठले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आव्हाड दुसऱ्या गाडीच्या पुढील बाजूस आव्हाड यांनी स्वत:ला झोकून दिलं. आव्हाड ही कार इंचभरही हलू देणार नाही अशा भूमिकेत थेट कारच्या खाली घुसले.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने