दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. याच सामन्यात पहिल्या दिवशी भारताविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना ख्रिस वोक्सला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. तो खेळण्याची शक्यता मावळली आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी ख्रिस वोक्सच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीत पुढे खेळणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५७ व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना वोक्सला दुखापत झाली. त्याने मिड-ऑफमधून चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडू अडवण्यासाठी उडी मारली. ही उडी चुकली आणि त्याच्या डाव्या खांद्याला जबर मार लागला. डाव्या खांद्याला दुखापत झाली.

बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्या अनुपस्थितीत जोश टंग, गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्या खांद्यांवर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. वोक्सने भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १८१ षटके टाकली आणि ११ बळी घेतले.
Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, टी20 संघाची धुरा सांभाळणार

[caption id="attachment_1073007" align="aligncenter" width="800"] सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या

India vs New Zealand live streaming: भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने

IND vs NZ 2nd ODI: वेलिंग्टनमध्ये विराट कोहलीच्या रडारवर सचिन आणि पॉन्टिंगचे विक्रम, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1072895" align="aligncenter" width="800"] विराट कोहलीची रनमशिन म्हणून ख्याती आहे. पण टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती

अंडर-19 आशिया चषकात भारताची विजयी सलामी! नेपाळचा 10 विकेट्सने धुव्वा; पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्याआधी दमदार संदेश

मस्कत : अंडर-19 आशिया चषक 2026 मध्ये भारतीय युवा संघाने शानदार विजयी सुरुवात केली आहे. ओमानमधील अल अमरात येथे झालेल्या

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपणार का? वेलिंग्टनमधील रेकॉर्ड पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

[caption id="attachment_1072774" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या

IND vs BAN: भारतीय संघ जानेवारी महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार? दोन वर्षांचा गुंता सुटला का?

बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती आहे. दरम्यानच्या काळात