शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, 'या' मुद्यावर झाली सविस्तर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या एका मुद्यावर सविस्तर चर्चा झाली असे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. यवतमध्ये झालेल्या हिंसेबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनी फोनवर चर्चा केल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले.

पुण्यातील यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने स्टेटसला एक संदेश ठेवला होता. या स्टेटसवरुन गावात शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी हिंसा झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता यवतमध्ये संचारबंदी लागू आहे. विना परवानगी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

शरद पवारांनी यवत मधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेचे तपशील अद्याप समजलेले नाहीत. विशेष म्हणजे पवारांनी फोन करण्याच्या आधीच शरद पवार आणि रोहिणी खडसे यांचीही सविस्तर चर्चा झाली होती. पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात शरद पवार समर्थक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली. कोर्टाने प्रांजलची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. रोहिणी खडसे आणि शरद पवार भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्याशी फोनवर चर्चा केली.

 
Comments
Add Comment

Nashik : नाशिकमध्ये वाहनांच्या ई-लिलावाची प्रक्रिया, वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (RTO) आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १५ वर्षे पूर्ण झालेली

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून