ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . पीडित तरुणीने इंस्टाग्रामवर 'कॅश लोन' नावाच्या मोबाईल ॲपची जाहिरात पाहून कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्यानंतर तिची आर्थिक फसवणूक झाली . हे प्रकरण एवढ्या वर थांबले नाही तर तिला बदनाम करण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. या संपूर्ण प्रकरणामुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला आहे .


जोगेश्वरी पश्चिममधील सुलतानाबाद चाळीतील क्रांती नगर परिसरात कुटुंबासह राहणाऱ्या पीडितेने इंस्टाग्रामवर “कॅश लोन” नावाच्या ॲपची जाहिरात पाहिली. तिला तातडीने पैशांची गरज असल्यामुळे तिने २० जुलै २०२५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास हे ॲप डाउनलोड केले. पीडितेने ॲपवर तिची सर्व वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स शेअर केले. तिने कोटक महिंद्रा बँकेचे खाते नंबर देऊन 2000 रुपयांचे कर्ज मागितले. त्यातून तिला फक्त 1300 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. हे कर्ज तिला सहा दिवसांसाठी दिले गेले .


परंतु कर्जाची मुदत संपण्याआधीच पीडितेला मोबाईलवरून धमक्यांचे मेसेज येऊ लागले. सदर आरोपीने तिला सांगितले की, जर तिने लगेच पैसे परत केले नाहीत, तर तो तिचे अश्लील फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल करेल. या भीतीपोटी पीडितेने ३१ जुलै रोजी संध्याकाळी दोन टप्प्यांत प्रत्येकी १००० रुपये, असे एकूण २००० रुपये UPI द्वारे पाठवले. हे पैसे फोनपेवर 'संदेश कुमार' नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले.


त्यानंतर पीडितेच्या मावशीने फोन करून सांगितले की, त्यांना व्हॉट्सॲपवर पीडितेच्या चेहऱ्याचे मॉर्फ केलेले एक नग्न छायाचित्र पाठवण्यात आले आहे. काही वेळातच पीडितेच्या आणखी दोन मित्रांनाही त्याच नंबरवरून हे फोटो पाठवण्यात आले. या मानसिक आघातानंतर पीडितेने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला आणि ते पोलीस ठाण्यात पोहोचले.


या प्रकरणी पोलिसांनी सदर आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. तसेच सदर ॲपवरून किंवा इतर ऑनलाईन साईटद्वारे कुठल्याही प्रकारचे लोन ना घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .

Comments
Add Comment

Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा मुंबईला फटका; विविध भागांत पावसाला सुरुवात

Mumbai Weather: मुंबईत शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी आणि धुरकट वातावरणाचा अनुभव आला. दादर,

Bandra Fire : वांद्रे पश्चिमेतील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai News: मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी आग

Dadar Station Hawkers : दादर रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा विळखा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील फेरीवाल्यांना क्यु आर कोड आधारीत ओळखपत्र देण्यात आल्यानंतर रेल्वे

Pollution control measures: प्रदुषणाची भीती, टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याच्या मुद्दयावर प्रशासन ठाम

मुंबई: मुंबईत वायू आणि धुळीच्या प्रदुषणाची भीती आता मोठ्याप्रमाणात पसरली असून त्यामुळे पुन्हा एकदा टँकरच्या

मध्य रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक! डोंबिवली अन् घाटकोपरमध्ये रात्री धावणार नाही लोकल, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

मुंबई: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डोंबिवली स्थानकावरील नवीन उत्तर पादचारी पुलाचे

एमपीएससीच्या ९ परीक्षांच्या कथित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी तीव्र; १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रासह निवेदने सादर करण्याचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि