वीस वर्षांनी आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का वाद घालता ? राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : आम्ही दोघं भाऊ जर वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांशी का वाद घालता ? आता वाद न घालता निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळावा सोमवारी मुंबईतील रंगशारदा येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना उद्धव समर्थकांशी जुळवून घेण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

निवडणुका जाहीर होण्याआधीच सध्याच्या मतदार याद्या तपासून घ्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सोबत घ्या; असे निर्देश राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत बलवान आहे. यावेळी मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता येणार आहे. हे मी फक्त टाळ्या-शिट्ट्या मिळवण्यासाठी बोलत नाहीये. जुन्या-जाणत्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, पक्षापासून दुरावले आहेत, त्यांना एकत्र करा आणि तयारीला लागा, असंही राज ठाकरे म्हणाल्याचं वृत्त आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर ?

जर आम्ही दोघं भाऊ वीस वर्षांनी एकाच मंचावर येऊ शकतो, तर तुम्हीही आपापसातले वाद बाजूला ठेवा आणि एकोप्यानं काम करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
Comments
Add Comment

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले