अंगारकी संकष्टीला सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, गणेश भक्तांना मिळणार लाभ

मुंबई (प्रतिनिधी): अंगारकी संकष्टी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असल्याने सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांच्या सुविधांच्या आनुषंगाने न्यास व्यवस्थापन समितीने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष नियोजन केले आहे.


भाविकांना न्यासातर्फे सिद्धिविनायक अॅपद्वारे गणपती बाप्पाच्या दर्शनाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या रांगेसाठी मंडप उभारण्यात येत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे. मुखदर्शन चप्पल स्टैंड व्यवस्था सिद्धी प्रवेशद्वाराबाहेरील पार्किंगजवळ करण्यात येणार आहे. गणपती बाप्पाचे दुरुन दर्शनाची व्यवस्था एस. के. बोले मार्गावरील मंदिर प्रवेशद्वार क्रमांक १ मधून करण्यात येणार आहे. मंदिरातर्फे रुग्णवाहिका, पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.


कोणत्याही भाविकास शारीरीक त्रास झाल्यास त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक / नवजात बालक/दिव्यांग व्यक्ती गरोदर स्त्रिया रांगः रिद्धी प्रवेशद्वारातून (काकासाहेब गाडगीळ मार्ग) प्रवेशद्वार क्रमांक ५ गाभारा तसेच वाहतुकीच्या सुविधा मेट्रो LINE 3 (AQUA LINE) ची सुविधा भाविकांना उपलब्ध असेल. तसेच न्यासातर्फे भाविकांसाठी एकूण २० खासगी वातानुकूलित बस भाड्याने मागवण्यात येत आहेत. बस मार्ग रवींद्र नाट्य मंदिर ते दादर स्थानक असा असणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने