मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी केएसआर बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसला बंगळुरू रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस या दोन गाड्यांना ऑनलाईन पद्धतीने (व्हिडीओ कॉन्फरन्स) हिरवा झेंडा दाखवला. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी बंगळुरूच्या बहुप्रतिक्षित येलो मेट्रो लाईनलाही हिरवा झेंडा दाखवला.

केएसआर बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस बंगळुरू, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकूर, यशवंतपूर आणि बेळगाव येथे थांबणार आहे. तर श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेस कटरा, जम्मू तावी, पठाणकोट केंट, जालंधर सिटी, बियास आणि अमृतसर येथे थांबणार आहे. नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही वंदे भारत मार्गातील ८८१ किलोमीटरची सर्वात लांब ट्रेन आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, पुणे ही या गाडीच्या मार्गावरील महत्त्वाची स्थानके आहेत.

या वंदे भारत गाड्या आठवड्यातून ६ दिवस धावतील, त्यामध्ये ७ चेअर कार + १ एक्झिक्युटिव्ह चेअर कारसह एकूण ५९० जागा असतील. या गाड्यांसाठी इकॉनॉमी श्रेणीच्या तिकिटांची सुरुवात १५०० रुपयांपासून होईल. महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांचा सरासरी वेग ताशी ७३ किमी असेल.

बंगळुरू येलो मेट्रो लाईनवर १६ स्थानके

बंगळुरू येलो मेट्रो लाईन ही १९.१५ किमी लांबीची आहे. यात १६ स्थानके आहेत. आरव्ही रोड, रागी गुड्डा, जयदेवा हॉस्पिटल, बीटीएम लेआउट, सेंट्रल सिल्क बोर्ड, बोम्मना हल्ली, होंगरा सँड्रा, कुडलू गेट, सिंगा सँड्रा, होसा रोड, बेरेटा अग्रहारा, इलेक्ट्रॉनिक सिटी, इन्फोसिस फाउंडेशन कोनाप्पाना अग्रहारा, हुस्कुर रोड, हेब्बा गोडी आणि बोम्मासंद्रा येथे मेट्रो थांबणार आहे.

नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये

नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी-हायस्पीड एसी चेअर कार सेवा आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि रात्री ९.५० वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन चालणार नाही. पुण्याहून ही ट्रेन सकाळी ६.२५ वाजता सुटून, संध्याकाळी ६.२५ वाजता अजनीला पोहोचेल. नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही वंदे भारत मार्गातील ८८१ किलोमीटरची सर्वात लांब ट्रेन आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, पुणे ही या गाडीच्या मार्गावरील महत्त्वाची स्थानके आहेत. या गाडीचे एसी चेअर कारचे भाडे १५०० रुपयांपासून सुरू होईल तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ३५०० रुपयांपासून सुरू होईल. या गाडीची सेवा १४ ऑगस्टपासून नियमित सुरू होईल.

Comments
Add Comment

Lionel Messi: मेस्सीची कमाल! लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावला 'गोल्डन बूट' पुरस्कार

मियामी (फ्लोरिडा): आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका

Bank Holiday: दिवाळीच्या तीन दिवसात बँका कधी चालू आणि कधी बंद?

Bank Holiday: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँकांना कधी न कुठपर्यंत सुट्टी असणार आहे. सोमवारी नोव्हेंबर महिन्याचा नवा आठवडा

अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची अनोखी दिवाळी! निषाद-दलित कुटुंबांसोबत साजरा केला सण

[caption id="attachment_1073550" align="aligncenter" width="800"] अयोध्येतील ऐतिहासिक दीपोत्सवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामघाट

World Gold Council Report: २५ टक्क्यांनी घसरलं सोनं, आता आणखी स्वस्त होणार की पुन्हा महागणार?

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2026 च्या

शून्यातून विश्व निर्माण केले! पंतप्रधान मोदींनी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना दिल्या शतकोत्सवी वर्षाच्या खास शुभेच्छा

आज, 8 नोव्हेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले

सीमेवर जवानांसोबत संरक्षण मंत्र्यांची खास दिवाळी; राजनाथ सिंह म्हणाले, "तुमच्यामुळेच देशात उजळतात दिवे

नाथुला (सिक्कीम): दिवाळीच्या सणानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भारत-चीन सीमेवरील सिक्कीमच्या