भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी चोरी, अनेक मानाचे पदक आणि पुरस्कारही पळवले

पश्चिम बंगाल: भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली असल्याची बातमी समोर येत आहे. या चोरीत त्यांचा पद्मश्री पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, तसेच विविध टूर्नामेंटमध्ये जिंकलेले सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देखील चोरट्यांनी पळवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरात अशाप्रकारे वारंवार चोरी होत असल्यामुळे पोलिस काय करत आहेत? असा प्रश्न जन सामान्यांकडून विचारला जात आहे.  नेमकं काय आहे प्रकरण, सविस्तर जाणून घेऊया.

भारतातील सर्वात प्रसिद्ध जलतरणपटूंपैकी एक असलेल्या बुला चौधरी यांच्या, पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील उत्तरपारा येथील  वडिलोपार्जित घरात चोरी झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये चोरट्यांनी ५४ वर्षीय बुला चौधरी यांचे भारतातील चौथ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्कारासह, २९५ पदके पळवून नेले. ज्याचा प्रचंड धक्का बुला चौधरी यांना बसलेला पहायला मिळालं. या घटनेनंतर चोरीच्या ४८ तासांत, स्थानिक पोलिसांनी त्यांना त्यांची पदके आणि पुरस्कार परत मिळवून दिले आहे. या घटनेच्या संबंधात एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.

चोरी नेमकी कशी झाली? 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या हुगली येथे भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या वडिलोपार्जित घरी चोरी झाली आहे.  चोरांनी घराच्या मागच्या बाजूने कडीकुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि पुरस्कारांसह अनेक घरगुती वस्तूदेखील लंपास केल्या.  या दरम्यान घरातील बऱ्याच सामानाचे नुकसान झाले असून या आधीही त्यांच्या घरात तीनवेळा चोरी झाल्याची खबर आहे. सध्या बुला चौधरी त्यांच्या कुटुंबासह कोलकाता येथील कसबा येथे राहतात, आणि वेळोवेळी त्या त्यांच्या हुगली येथील वडिलोपार्जित घरी येत असत.

ज्या घरात चोरी झाली त्यांची देखरेख त्यांचे भाऊ डोलन चौधरी करतात. जे आपल्या आजी-आजोबांसोबत या घरात राहतात. डोलन यांनी सांगितले की, याआधीही तीन वेळा चोरी झालेली असून प्रत्येक वेळी पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही या घटना वारंवार घडत होत्या. पूर्वी येथे एक पोलीस चौकी होती, मात्र तीही नंतर काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांचे घर असुरक्षित झाले आहे. घटनेनंतर उत्तरपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमिताभ सन्याल यांनी घटनास्थळी पाहणी करत थेट कारवाई केली. ज्यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात जरी आली असली तरी, ही घटना पुन्हा घडू नये अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बुला चौधरी कोण आहे?

१९७० मध्ये जन्मलेल्या बुला यांनी वयाच्या नऊ वर्षांच्या असताना पहिल्यांदाच आपला ठसा उमटवला आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धा जिंकली. इंग्लिश चॅनेल ओलांडून विक्रम करणाऱ्या बुला चौधरी या भारतातील सर्वात लोकप्रिय जलतरणपटूंपैकी एक आहेत. त्यांची कारकीर्द मोठी आणि आव्हानास्पद आहे,  जेव्हा देशातील बहुतेक लोक पोहणे हा खेळ म्हणून निवडत नव्हते तेव्हा बुला चौधरी यांनी या खेळाला प्राधान्य दिले. त्या राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय जलतरणपटू बनल्या.

 
Comments
Add Comment

Lionel Messi: मेस्सीची कमाल! लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावला 'गोल्डन बूट' पुरस्कार

मियामी (फ्लोरिडा): आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका

Bank Holiday: दिवाळीच्या तीन दिवसात बँका कधी चालू आणि कधी बंद?

Bank Holiday: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँकांना कधी न कुठपर्यंत सुट्टी असणार आहे. सोमवारी नोव्हेंबर महिन्याचा नवा आठवडा

अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची अनोखी दिवाळी! निषाद-दलित कुटुंबांसोबत साजरा केला सण

[caption id="attachment_1073550" align="aligncenter" width="800"] अयोध्येतील ऐतिहासिक दीपोत्सवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामघाट

World Gold Council Report: २५ टक्क्यांनी घसरलं सोनं, आता आणखी स्वस्त होणार की पुन्हा महागणार?

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2026 च्या

शून्यातून विश्व निर्माण केले! पंतप्रधान मोदींनी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना दिल्या शतकोत्सवी वर्षाच्या खास शुभेच्छा

आज, 8 नोव्हेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले

सीमेवर जवानांसोबत संरक्षण मंत्र्यांची खास दिवाळी; राजनाथ सिंह म्हणाले, "तुमच्यामुळेच देशात उजळतात दिवे

नाथुला (सिक्कीम): दिवाळीच्या सणानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भारत-चीन सीमेवरील सिक्कीमच्या