आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे. कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून ते 21 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात 40-50 किमी प्रति तास वादळी वारे वाहण्याची ही शक्यता वर्तवली गेलीय.

वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, सखल भागात किंवा नदी, नाल्याकाठी असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याच आव्हान करण्यात आलंय.

जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला नदीसदृश स्वरूप प्राप्त झाले असून, कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने दुकाने आणि घरांमध्ये शिरलं आहे. तर कोकण किनारपट्टीत 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50-60 किमी प्रति तास वेगाने वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या