महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका, 'या' निवडणुकीत पराभव


दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही.


​बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.


मुंबई: दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. ​बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे.


​बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या 'उत्कर्ष' पॅनलला मात्र भोपळाही फोडता आला नाही.



​काय आहे निकाल:-


​शशांक राव पॅनल: 14


​प्रसाद लाड पॅनल: 07


​मनसे - शिवसेना: 00


१८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने मजमोजणीस विलंब झाला. अखेर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला जबर धक्का बसला आहे.


बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे. ​गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेने बेस्टमध्ये जे खाजगीकरण आणले आणि कामगारविरोधी धोरणे राबवली, त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून येते. म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने