भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ मागील लोकसभा निवडणुकीच्या आधीच संपला. निवडणूक तोंडावर असल्याने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. आता निवडणूक सव्वा वर्ष उलटली तरीही भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाला नवा अध्यक्ष मिळू शकतो.


बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याआधी भाजपला नवा अध्यक्ष मिळालेला असेल. राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्यास विलंब होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुरु असलेले विचारमंथन आहे. भाजप आणि संघाने १०० वरिष्ठ नेत्यांची मते विचारात घेतली आहेत. यात पक्षाचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि संघ, भाजपशी संबंधित वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.


अचानक लागलेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक भाजप अध्यक्षांची निवड रखडण्यामागचे दुसरे कारण म्हणजे जगदीप धनखड अचानक राजीनामा देतील याची कल्पना भाजपला केली होती. धनखड यांनी पायउतार केल्याने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लागली. त्यामुळे आता ही निवडणूक भाजपसाठी प्राधान्याचा विषय आहे. एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन अधिकाधिक मतांनी जिंकावेत यासाठी सध्या भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.


तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडण्यास होत असलेला विलंब आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला अद्याप नवा प्रदेशाध्यक्ष मिळालेला नाही. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातही हीच स्थिती आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. गुजरात भाजपचे अध्यक्षपद सध्याच्या घडीला सी. आर. पाटील यांच्याकडे आहे. गेल्या ५ वर्षांपासून त्यांच्या गुजरात भाजपची धुरा आहे. ते नवसारीतून चारवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.


सध्या त्यांच्याकडे जलशक्ती मंत्रिपदाचा कार्यभार आहे. मोदी, शहांच्या गुजरातमध्ये भाजपचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात वेगळाच पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याची भाजपच्या नेतृत्त्वाची तयारी नाही. तशी नियुक्ती झाल्यास राज्य सरकारसह संघटनेवर योगी यांचे वर्चस्व निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आदित्यनाथ यांच्या कंपूबाहेरील व्यक्तीकडे धुरा दिली जाण्याची दाट शक्यता आहे.


आधी राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची नेमणूक करुन मग पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा, असा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याआधी ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील किमान १९ ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची नेमणूक होणे गरजेचे आहे. भाजपच्या घटनेत तसा उल्लेख आहे.

Comments
Add Comment

World Gold Council Report: २५ टक्क्यांनी घसरलं सोनं, आता आणखी स्वस्त होणार की पुन्हा महागणार?

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2026 च्या

शून्यातून विश्व निर्माण केले! पंतप्रधान मोदींनी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना दिल्या शतकोत्सवी वर्षाच्या खास शुभेच्छा

आज, 8 नोव्हेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले

सीमेवर जवानांसोबत संरक्षण मंत्र्यांची खास दिवाळी; राजनाथ सिंह म्हणाले, "तुमच्यामुळेच देशात उजळतात दिवे

नाथुला (सिक्कीम): दिवाळीच्या सणानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भारत-चीन सीमेवरील सिक्कीमच्या

नक्षलवाद संपला, पण मानसिक नक्षलवादी अजूनही शिल्लक; बस्तरमधून मोदींचा विरोधकांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने छत्तीसगढमधील बस्तरला भेट दिली. त्यांनी सुरक्षा

व्हाइट हाऊसपासून दुबईपर्यंत भारतीय संस्कृतीचा डंका! परदेशात कशी साजरी झाली धडाकेबाज दिवाळी?

दिवाळी हा केवळ भारताचाच नव्हे, तर आता जगभरात आवडीने साजरा केला जाणारा एक जागतिक उत्सव बनला आहे. अमेरिकेतील

Pm Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची परंपरा कायम! यंदाची दिवाळी सुद्धा सुरक्षा दलातील जवानांसोबत केली साजरी...

नवी दिल्ली: देशभर उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे