विरार पूर्व इमारत दुर्घटनेत घरे गमावलेल्या नागरिकांना म्हाडाची ६० घरे तात्पुरत्या स्वरूपात मिळणार !

मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार इमारत दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट


पालघर:  विरारमध्ये इमारत कोसळून (Virar Building Collapse) १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही सर्वजण , राज्य सरकार नागरिकांच्या सोबत उभे आहोत. शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विरारच्या या दुर्घटनेत ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय बोलींज म्हाडा प्रकल्प येथील घरांमध्ये करण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षाना सूचना केल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरनाईक यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली. बोलींज म्हाडा प्रकल्पातील ६० घरे लगेच दुर्घटनाग्रस्त नागरिकाना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी देण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला. या रहिवाशांना उद्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी म्हाडाची घरे दिली जातील , असे सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयात याबाबत बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वसई विरारमधील धोकादायक , जुन्या इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणि लागू केला जाईल , असेही उपमुख्य मंत्री शिंदे यांनी व मंत्री सरनाईक यांनी सांगितले. याबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बैठक घेणार आहेत , अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्यावरील उपचारा बाबत महापालिकेला सूचना केल्या . त्यानंतर दुर्घटना स्थळाला भेट दिली. महापालिका मुख्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेऊन भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून काय काय उपाययोजना करता येईल त्याचा आढावा घेतला.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की , वसई विरार महापालिकेचा स्वतःचे एकही संक्रमण शिबिर नाहीये. अशी एखादी दुर्घटना घडली तर विस्थापित नागरिकांना राहण्यासाठी महापालिकेने घरांची व्यवस्था करण्यासाठी गृह प्रकल्प तयार करावा. म्हाडा सोबत जॉइंट वेंचर करून महापालिकेने आधी स्वतःची घरे उपलब्ध करून घ्यावीत. वसई विरार नालासोपारा मध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक अनधिकृत इमारती आहेत. या इमारतींसाठी क्लस्टर योजना व एसआरए योजना लागू करावी, याबाबत महापालिकेने प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवावा , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लवकरच घेतली जाईल , असे सरनाईक यांनी सांगितले.

लोकांना न्याय मिळवून देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन


यावेळी मंत्री सरनाईक यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेतून फोन लाऊन सर्व माहिती दिली. वसई विरारच्या प्रश्नावर लवकरच मी बैठक घेतो आणि तेथे क्लस्टर डेव्हलपमेंट , एसआरए प्रत्यक्षात लागू करून लोकांना न्याय दिला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यापुढे अनधिकृत बांधकामाची एकही वीट नको !


आजवर अनधिकृत बांधकामे करून बिल्डरांनी लोकांची फसवणूक केली. यापुढे वसई विरार मध्ये एकही अनधिकृत बांधकामाची भिंत उभी राहता कामा नये. अनधिकृत बांधकामे आणि दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या. शहरात यापुढे अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापालिका प्रशासनाने तातडीने मदतकार्य करावे आणि जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित व स्थानिक आमदार राजन नाईक यांनी दुर्घटना घडलेल्या इमारतीमधील २८ कुटुंबांना प्रत्येकी २०/२० हजार तातडीची मदत वैयक्तिक रित्या केली आहे. यावेळी आमदार राजेंद्र गावित , खासदार हेमंत सवरा , आमदार राजन नाईक , पालघर जिल्हाधिकारी , वसई विरार मनपा आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी देखील उपस्थित होते.
Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य