आज मिती भाद्रपद शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र हस्त. योग शुभ. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ८ भाद्रपद शके १९४७. शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२२, मुंबईचा सूर्यास्त ६.५५, मुंबईचा चंद्रोदय ८.४६, मुंबईचा चंद्रास्त ९.००, राहू काळ ३.४७ ते ५.२१. सूर्याचा पूर्वफाल्गुनी नक्षत्र प्रवेश, -वाहन-म्हैस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आपल्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास चांगला असणार आहे.
वृषभ : आपल्या स्मरणशक्तीचा चांगला फायदा झालेला दिसेल.
मिथुन : अनावश्यक प्रवास टाळले पाहिजेत.
कर्क : आपल्या मध्यस्थीमुळे कामे होणार आहेत.
सिंह : नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे.
कन्या : सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल.
तूळ : थोडा संयम ठेवलेला बरा.
वृश्चिक : नोकरीमध्ये अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे.
धनू : कुठलेही निर्णय घाई घाईने घेऊ नका.
मकर : कामामध्ये चांगले बदल घडतील.
कुंभ : ताणातून आणि अडचणींतून दिलासा मिळणार आहे.
मीन : उद्योग अथवा व्यवसायामध्ये समृद्धी मिळणार आहे.