शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी शिक्षकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला. टीईटी परीक्षा उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना सेवेत कायम ठेवता येईल किंवा त्यांना पदोन्नती मिळेल. निवृत्तीला फक्त पाच वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच टीईटीमधून सूट दिली जाईल.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ज्यांची निवृत्ती पाच वर्षांवर आली आहे ते कोणत्याही टीईटीशिवाय त्यांचा सेवाकाळ पूर्ण करू शकतील. मात्र पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा बाकी असलेल्यांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर ते टीईटी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना नोकरी सोडावी लागेल किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन टर्मिनल बेनिफिट्स घ्यावे लागतील असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने २०१०मध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी किमान योग्यता निश्चित केली होती. त्यानंतरच टीईटीला शिक्षक भरतीसाठी बंधनकारक केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता टीईटीची अट बंधनकारक केली जाणार आहे. महाराष्ट्र, तामिळनाडुसह वेगवेगळ्या राज्यातून टीईटी संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांमध्ये टीईटी उत्तीर्ण नसेल तरी शिक्षक म्हणून कायम रहावे का आणि पदोन्नती मिळावी का असे प्रश्न उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना टीईटी बंधनकारक केली आहे.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि