"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर सामन्यांच्या खिशाला कात्री लावून जातात. गेले कित्येक वर्षांपासून वाढत चाललेली ही सामन्य माणसांची ही आर्थिक चणचण आता काहीप्रमाणात कमी होणार आहे. कारण. महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या जखमावर अखेरीस केंद्र सरकारने मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यात सामान्यांच्या हितावह अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिकिया देखील समोर आली. 'दिलेला शब्द मी पाळला, जे बोललो होतो ते करून दिले" असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सांगितले आहे.

जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल


२०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीच्या करप्रणालीमध्ये अखेरीस बदल करण्यात आला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. आता याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल' अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती


जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार आहे. या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हंटले पंतप्रधान मोदी?





"'स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी म्हटलं होतं की, आम्ही जीएसटीमध्ये पुढील पिढीसाठी सुधारणा आणण्याचा मानस करतो. केंद्र सरकारने एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये व्यापक जीएसटी दरांचे तार्किक पुनर्रचना आणि प्रक्रिया सुधारणांचा समावेश आहे. त्याचे उद्दिष्ट सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे.' अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.

तसंच, 'जीएसटी कौन्सिल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही समाविष्ट आहेत, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दरांमध्ये कपात आणि सुधारणांचे प्रस्ताव एकत्रितपणे मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल. या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवन सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करण्याची सोय सुनिश्चित होईल' अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक