Pune Kasba Ganpati Visarjan: कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या...

पुणे: आज अनंत चतुर्दशी, दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील गणेश मूर्त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्यातही मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला जोरदार सुरुवात झाली आहे. पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती हा लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, ढोल ताशाचा गजर आणि गुलालाच्या रंगात पुण्याचे रस्ते रंगले आहेत. दरम्यान कसबा गणपतीच्या भव्य मिरवणुकीत गणेश भक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे, कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पुण्याच्या रस्त्यावर रंगीत रांगोळ्याच्या पायघड्या दिसून आल्या, ज्यामुळे गणेशोत्सवाची रंगत आणखीनच वाढली.

कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या


पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्यांमध्ये फुलांच्या रांगोळ्या, पारंपरिक डिझाइन्स, सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले. या रांगोळीने मिरवणुकीला खास रंगत आणली. कसबा गणपतीच्या मिरावणुकीच्या ठिकाणपासून अलका चौका पर्यंत रांगोळीच्या पायघड्या घातल्या गेल्या. यासाठी एक हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने मागच्या २८ वर्षांपासून कसबा गणपतीच्या मिरवणुकीत रांगोळी काढली जाते. वेगवेगळे सामाजिक संदेश या माध्यमातून दिले जातात. यावर्षी प्लास्टिक, आणि कचरा या विषयावर सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Lalbuagcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या सोने-चांदीचा आज लिलाव; १.४८ कोटींची सोन्याची वीट अन् सोन्याची गणेशमूर्ती मुख्य आकर्षण

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' (Lalbuagcha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांनी

Andhericha Raja 2026 : 'अंधेरीचा राजा' 29 सप्टेंबरला निघणार विसर्जनासाठी! अनंत चतुर्दशीनंतरही का थांबतो अंधेरीचा राजा? जाणून घ्या खास परंपरा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला झाली असली तरी अंधेरीतील प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’चा

Ganeshotsav 2026 : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ; बाप्पाच्या विसर्जनात उत्साहाने सहभाग

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने

Ganesh Visarjan 2026: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले आहे.

Lalbaugcha Raja 2026 : नातवंडांसह लालबागच्या राजाच्या आरतीत सहभागी झाले मुकेश आणि नीता अंबानी, पाहा Video

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज, 25 सप्टेंबर रोजी मुंबईत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. बाप्पाला

Mumbaicha Raja Visarjan 2026 : 'मुंबईचा राजा' गणेशगल्ली इतिहास घडवणार! २२ फुटी मूर्तीचे अरबी समुद्रात 'बार्ज जहाजा'द्वारे होणार भव्य विसर्जन

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या शंभर वर्षांच्या प्रवासात यंदा एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय जोडला जाणार आहे.