चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ


मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो तो बाप्पाच्या सेवेतील सेवेकऱ्यांमुळे आणि त्यांच्या अविरात श्रमामुळे. चिंचपोकळीचा चिंतामणी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणाऱ्या आपल्या या बाप्पाला भेटण्यासाठी अनेक जण आतुर असतात. त्यांच्या दर्शनाची ही अनुभूती सुखाची ठरते ती कार्यकर्त्यांमुळे. चिंतामणीच्या चरणी मागच्या दोन दशकाहून अधिक काळ अविरत सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग मोरे उर्फ पांड्या मामा. मागच्या तीन दशकांहून अधिक काळ चिंतामणीच्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणारे सगळ्यांचे लाडके पांडुरंग मोरे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.


पांडुरंग मोरे यांच्या कार्याला सलाम करणारे एक आगळे वेगळे गीत मयेकर फिल्सच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ‘सुखकर्ता मोरया’ या गाण्यामध्ये पांडुरंग मोरे यांच्या सेवाकार्याला वंदन करण्यात आले आहे. केवल वालंज यांच्या आवाजातून व विपुल शिवलकर यांच्या शब्द सुमनांमधून साकारलेले हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. दृकश्राव्य माध्यमातून गीताचे दिग्दर्शन प्रथमेश अवसरे यांनी केले आहे, तर या गीतामागची पटकथा पराग सावंत यांनी लिहिली आहे. पांडुरंग मोरे यांच्या भूमिकेत काम केलेले शशिकांत दळवी यांनी सुद्धा अत्यंत तन्मयतेने आपली भूमिका वठवल्याचे पाहायाला मिळते.



“पांडुरंग मोरे यांचे कार्य प्रकाशझोतात येणे गरजेचे”


“पांडुरंग मोरे मागचे ३५ ते ४० वर्ष, चिंचपोकळीच्या चिंतामणीची मनोभावे सेवा करत आहेत. अनेक वर्षांपासून माझी अशी इच्छा होती की त्यांचं काम लोकांसमोर आलं पाहिजे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा विषय केंद्रस्थानी ठेवून, मग आम्ही म्युझिक व्हिडीओ तयार करण्याचा विचार केला, जो आज लोकांच्या पसंतीस उतरला आहे, असे निर्माते मयुरेश अवधूत मयेकर यांनी सांगितले.




Comments
Add Comment

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांनी 'KBC'चं अचानक शूटिंग बंद केलं; नेमकं कारण काय?

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह आणि लाडके महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि चिंता वाढवणारी

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचे जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटोस

[caption id="attachment_1073309" align="alignnone" width="800"] 'सैराट' चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 वर्षे झाली तरी आर्चीची क्रेझ काही संपता

Bigg Boss 20: सलमान खानच्या बिग बॉस 20 ने रचला इतिहास! 60 दिवसांत पूर्ण केला 100 कोटींचा वॉचटाइम

लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस' चा 20 वा सिझन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानच्या

दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचा सिक्वेल; भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

निर्माती प्रियंका चोप्रा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘व्हेंटिलेटर 2’

Yetech aata me Nandayla: एकीकडे मी बांदेकरांच्या घरी नांदायला आले, तर दुसरीकडे शिवानी कदम म्हणून प्रेक्षकांच्या मनात ‘येतेच आता मी नांदायला’- पूजा बिरारी

Pooja Birari:  महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या घरी अलीकडेच नव्या सुनेचा गृहप्रवेश झाला आहे. यंदाची

Harry Boxer : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधार हॅरी बॉक्सर पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये एका मागून एक अनेक बड्या कलाकारांना बिष्णोई गँगने धमक्या दिल्या आहेत. यातील एक म्हणजे