जेएनपीटीमधील मोठी बातमी! पाकिस्तानी वस्तू दुबईमार्गे भारतात, दोघांना अटक

नवी मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या व्यापाराला पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असले तरी, भारतात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी होत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अलीकडेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने दुबईमार्गे भारतात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. ही तस्करी जेएनपीटी बंदरावर केली जात होती. 


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर,  भारत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडत असताना, काही लोकं अधिकाऱ्यांचे लक्ष चुकवून दुबईमार्गे पाकिस्तानी वस्तू आयात करून कोट्यवधी रुपयांचा व्यापार करत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.


मुंबईस्थित महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने जेएनपीटी बंदरावर मोठी कारवाई केली आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत, १२ कोटी रुपयांच्या सौंदर्य प्रसाधने आणि सुक्या खजूरांनी भरलेले २८ कंटेनर जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.



भारत सरकारकडून पाकिस्तानमध्ये आयात बंदी 


भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे. त्यानंतर, डीआरआयने 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतात येणाऱ्या वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.



भारतातून पाकिस्तानला बेकायदेशीर मार्गांनी पैसे पाठवले जात होते


हाती आलेल्या माहितीनुसार, दुबईस्थित हा पुरवठादार कमिशनवर काम करत होता आणि त्याच्या कंपन्यांचा वापर बेकायदेशीर मार्गांनी भारतातून पाकिस्तानला पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जात होता. भारत सरकारच्या कठोर योजना असूनही, मूळ देशाबद्दल खोटी माहिती आणि आणि खोट्या शिपिंग कागदपत्राद्वारे फसव्या शिपमेंट अद्याप सुरूच आहेत. म्हणूनच, यावर कठोर कायदे आणि अंमलबजावणीची मागणी आता जोर धरत आहे.


Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२