...म्हणून या दिवसापासून मोनोरेल सेवा बंद

मुंबई : आधुनिकीकरणाचे काम करता यावे म्हणून मुंबईची मोनोरेल सेवा शनिवार २० सप्टेंबर २०२५ पासून काही दिवसांसाठी बंद केली जाणार आहे. मोनोरेल पुन्हा कधी सुरू करणार याची माहिती एमएमआरडीए योग्य वेळी देणार आहे. मोनोरेल १९ ऑगस्टपासून १७ सप्टेंबर दरम्यान महिन्याभरात तीन वेळा बंद पडली. प्रवाशांचे हाल झाले. याची गंभीर दखल घेऊन आधुनिकीकरणाचे काम करण्यासाठी मोनोरेल काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले.

सेवा बंद असताना मोनोरेलची सिस्टिम अपग्रेड केली जाईल. नवीन रोलिंग स्टॉकचे जलद एकत्रीकरण, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग अपग्रेड आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा मोनोरेलमधील प्रवास आणखी सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे. अत्याधुनिक सिग्नलिंग सिस्टम, हैदराबादमध्ये विकसित केलेली अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टम (सीबीटीसी) मोनोरेलमध्ये बसविली जाईल.

आधुनिकीकरणाचे काम केल्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा तपासण्या केल्या जातील. यानंतर मोनोरेल पुन्हा कधी सुरू करायची याचा निर्णय तंत्रज्ञांच्या सल्ल्याने घेतला जाईल. एमएमआरडीए प्रसिद्धीपत्रक काढून मोनोरेल कधी सुरू करणार याची माहिती योग्य वेळी देईल.

एमएमआरडीएने २४६० कोटी रुपये खर्च करून उभारलेली २० किमी लांबीची चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल सेवा तोट्यात आहे. प्रवाशांचा अपुरा प्रतिसाद, गाड्यांचे वारंवार होणारे अपघात आणि तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल पुढील समस्या वाढत आहेत.

१९ ऑगस्ट २०२५ - म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल बंद, अडकलेल्या प्रवाशांची अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका, सेवा काही तास ठप्प
२१ ऑगस्ट २०२५ - तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटांसाठी मोनोरेल बंद
१५ सप्टेंबर २०२५ - वडाळ्याजवळ एका मार्गावरील मोनोरेल काही काळ बंद
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म