iPhone 17 Pro साठी फ्रीस्टाइल हाणामारी, BKC मध्ये राडा

iPhone 17 Pro: अ‍ॅपलचे बहुप्रतीक्षित आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरच्या विक्रीला आजपासून भारतीय बाजारपेठेत सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या आयफोन १७ च्या सिरिजची (iPhone 17 Series Launched) मागणी भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यासाठी लोकांनी रात्रीपासून अ‍ॅपल स्टोअरबाहेर रांगा लावल्या होत्या. इतकेच नव्हे तर भारताच्या प्रत्येक अ‍ॅपल स्टोअरच्या बाहेरलोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. मात्र या दरम्यानच मुंबई, बिकेसीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, बिकेसी अ‍ॅपल स्टोअरबाहेर आयफोन खरेदी करण्यास आलेल्या गर्दीतल्या लोकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. 



आयफोन १७ सिरिजच्या विक्रीला सुरूवात


दिनांज ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरची विक्री आज, १९ सप्टेंबरपासून सुरू खाली आहे. या सिरिजच्या खरेदीसाठी मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये लांबच लांब रांगा आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये असलेल्या या अ‍ॅपल स्टोअर बाहेर देखील लोकांची प्रचंड गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच इथे आयफोनच्या खरेदीसाठी रांग लावून होती. यादरम्यान शोरूम बाहेर लोक त्यांच्या पाळीची वाट पाहत असताना, काही लोकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या या हिंसक कृतीमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र,  घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.



किंमत काय आहे?


अ‍ॅपलने लॉंच केलेल्या नव्या फोनबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन १७ ₹८२,९०० पासून सुरू होतो. आयफोन एअर ₹११९,९०० च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. तर आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स अनुक्रमे ₹१३४,९०० आणि ₹१४९,९०० पासून सुरू होतो. 

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर