I Phone 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बीकेसीत भाऊगर्दी! आजपासून नवा आयफोन भारतीय बाजारात दाखल

प्रतिनिधी:आयफोन १७ स्मार्टफोन सिरीजच्या विक्रीला सुरूवात झाल्याने ग्राहकांनी बीकेसी येथे गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात अँपलचे चाहते आउटलेटमध्ये गर्दी करत आहेत. ८२९०० ते २२९९०० रुपयांच्या घरात असलेल्या या आयफोन विक्रीत मोठी वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात आँनलाईन खरेदीत वाढ झाली आहे. सर्वाधिक लक्झरी फोनमधील मागणी आयफोनला असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. आयफोन १७ नंतर आयफोनला १६ ला ग्राहकांनी पसंती दिली होती. आजपासून ज्यांनी प्री बुकिंग केले होते त्यांना या फोनचा आजपासून उपभोग घेता येईल.एक नावीन्यपूर्ण बाब म्हणजे नव्याने लाँच झालेल्या आयफोन १७ साठी लागणाऱ्या कामाच्या तासांच्या संख्येत भारत जगात अव्वल आहे, सरासरी भारतीय कामगाराला देशाच्या सरासरी वेतनानुसार ९६७ तास का म करावे लागते. हे स्टॅटिस्टाने (Statista) केलेल्या एका अभ्यासानुसार स्पष्ट झाले होते. ज्यामध्ये भारताला जागतिक यादीत अव्वल स्थान देण्यात आले आहे, त्यानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो, जिथे आयफोन १७ मिळविण्यासाठी सरासरी कामगाराला ५९८ तास कष्ट करावे लागतात.


नवीन लाँच केलेले डिव्हाइस खरेदी करणाऱ्यांमध्ये पहिले असण्याची आशा बाळगून अनेक खरेदीदार मध्यरात्रीपासून रांगेत उभे होते. अनेक ग्राहक देशाच्या विविध भागातून प्रवास करत होते, ज्यामुळे अॅपलच्या नवीनतम आयफोन्सची देशभरातील मागणी दि सून येते.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या 'अवे ड्रॉपिंग' कार्यक्रमात अँपलने सादर केलेल्या आयफोन १७ लाइनअपमध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात अपग्रेडेड ऑडिओ आणि हेल्थ-ट्रॅ किंग वैशिष्ट्यांसह अँपल वॉच सिरीज ११, वॉच अल्ट्रा ३, वॉच एसई ३ आणि एअरपॉड्स प्रो ३ लाँच करण्यात आले होते. माहितीनुसार आयफोन १७ ला इन्स्टंट कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि दीर्घकालीन ईएमआय पर्यायांसह ऑफर देण्यात आल्या आहेत आय फोन १७ ची विक्री सुरू, मुंबई, दिल्लीच्या स्टोअरमध्ये प्रचंड गर्दी, लाँच ऑफर्स, सवलती देण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! जळगाव ते पानिपत विशेष ट्रेन, भुसावळसह अनेक स्थानकांवर थांबे

Jalgaon : सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने जळगाव ते

Mumbai Fire News : साकीनाका परिसरात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन

Nitesh Rane : उद्धव ठाकरे आणि दिमागी नक्षलींची भाषा एकच!, मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

उबाठाने यापुढे बॅनरवर जिना आणि उमर खालिदचे फोटो लावावेत मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील उबाठाच्या दसरा

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस

Nashik Crime : नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा वापर ! पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी बोगस दाखला, गुन्हा दाखल

Nashik Crime : येवला तालुक्यात प्रस्तावित पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह 4 जणांना अटक; शस्त्र मुंबईत आणल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाच्या तपासात दिल्ली