मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल त्यांच्या सिने कारकीर्दीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०२३ चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही घोषणा केली. २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोहनलाल यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की "दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकार मोहनलाल यांना हा पुरस्कार प्रदान करणार असल्याची घोषणा करत आहे" पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की मोहनलाल यांची असाधारण चित्रपट करकीर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आली आहे. त्यांनी केवळ एक कुशल अभिनेते म्हणून नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही भारतीय चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे."



पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन




या घोषणेनंतर, मोहनलालचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांचे यश साजरे करत आहे. मोहनलाल चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करत आहे. त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते आतापर्यंत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये झळकले असून, त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली आहे. मोहनलाल यांना यापूर्वी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.



मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची कारकीर्द


मोहनलाल यांचा जन्म २१ मे १९६० रोजी केरळमध्ये झाला. त्याने १९७८ च्या थिरानोटम चित्रपटाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अभिनयातील योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


भारत सरकारने त्याला पद्मश्री (२००१) आणि पद्मभूषण (२०१९) सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने लालजी म्हणतात. २००९ मध्ये, मोहनलाल हे भारतीय चित्रपट उद्योगातील पहिले अभिनेते बनले ज्यांना भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळाली. २०२२ मध्ये, हा सन्मान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला.

Comments
Add Comment

Bigg Boss 20: सलमान खानच्या बिग बॉस 20 ने रचला इतिहास! 60 दिवसांत पूर्ण केला 100 कोटींचा वॉचटाइम

लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस' चा 20 वा सिझन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानच्या

दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचा सिक्वेल; भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

निर्माती प्रियंका चोप्रा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘व्हेंटिलेटर 2’

Yetech aata me Nandayla: एकीकडे मी बांदेकरांच्या घरी नांदायला आले, तर दुसरीकडे शिवानी कदम म्हणून प्रेक्षकांच्या मनात ‘येतेच आता मी नांदायला’- पूजा बिरारी

Pooja Birari:  महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या घरी अलीकडेच नव्या सुनेचा गृहप्रवेश झाला आहे. यंदाची

Harry Boxer : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधार हॅरी बॉक्सर पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये एका मागून एक अनेक बड्या कलाकारांना बिष्णोई गँगने धमक्या दिल्या आहेत. यातील एक म्हणजे

Raha's Birthday: आलिया आणि रणबीरच्या मुलीचा राहाचा चौथा वाढदिवस; आलियाने शेअर केले खास क्षण

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांची मुलगी राहाचा चौथा वाढदिवस कुटुंबाच्या उपस्थितीत, रंगीबेरंगी सजावट आणि

Gauri Ingawale: अभिनेत्री गौरी इंगवलेच्या ग्लॅमरस लूकची चर्चा

[caption id="attachment_1072964" align="alignnone" width="800"] अभिनेत्री गौरी इंगवले हीचा दशमी हा चित्रपट 23ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला