वय चोरणाऱ्या महिला लाडक्या बहीण योजनेतून बाद

लातूर : एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ मिळेल असे फडणवीस सरकारने आधीच जाहीर केले आहे. पण काही कुटुंबातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असल्याचे दिसत आहे. या व्यतिरिक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठीच लाडकी बहीण योजना असताना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असूनही योजनेचे लाभ घेतल्याचे सिद्ध झाले आहे. आता या गैरफायदा घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकट्या लातूर जिल्ह्यातल्या चार हजार ८२७ महिला याच कारणांमुळे योजनेतून बाद झाल्या आहेत.

महिला, मुलींना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची नियमावली सरकारने आधीच जाहीर केली आहे. पण नियमांना डावलून स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन काही महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू केली आहे. गैरफायदा घेणाऱ्या तसेच नियमात न बसणाऱ्या जिल्ह्यातील महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.

काही कुटुंबांतील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतानाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने फेरपडताळणी करण्यात आली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात ५ लाख ९२ हजार २३१ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७७२ प्रस्ताव अपात्र ठरले. लातूर जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार ४५९ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात १६१६ महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या संशयावरून ५५ हजार ०९२ महिलांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ३ हजार २११ महिला अपात्र ठरल्या आहेत.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा