राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली


मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. मागच्या महिन्यात राज्यातील सात आयएएस बदल्या झाल्या. नंतर दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांत डांगे आणि प्रवीण पुरी यांची बदली करण्यात आली. आता विनिता वैद – सिंघल आणि सोनिया सेठी यांची सुद्धा बदली करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून नऊ महिन्यांत राज्यातील अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या करण्यात आल्या आहेत.


आयएएस अधिकारी विनिता वैद सिंघल या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव होत्या. आता आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. पण १७ एप्रिल रोजी त्यांची बदली झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. आयएएस अधिकारी विनिता वैद सिंघल ह्या १९९६ बॅचच्या महाराष्ट्रातील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या विनिता यांनी इंग्रजी साहित्यात एमए केलेले आहे. त्यांनी यापूर्वी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे.


आयएएस अधिकारी सोनिया सेठी महसूल आणि वन विभागात मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्या मुंबईत बेस्ट विभागाच्या महाव्यवस्थापक म्हणून काम बघतील. डॉ. सोनिया सेठी या महाराष्ट्र केडरच्या १९९४ बॅचच्या एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमए आणि एमबीए केले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त आणि राज्य शासनाच्या नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून काम केले होते.


Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक