कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई



मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

तसेच, राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता १० ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला केल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याण दुग्धविकास मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ओबीसी संघटनांचे सुमारे ४० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी माध्यमांना माहिती दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, ‘मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या जीआरचा कुणीही गैरफायदा घेऊ नये व बनावट प्रमाणपत्रे दिली जाऊ नयेत, यावर सरकार आणि शिष्टमंडळ यांचे एकमत झाले आहे. बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी काही अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिल्याचे पुरावे सादर केले. यावर, ‘जर एखाद्या अधिकाऱ्याने खोटे प्रमाणपत्र दिले, तर त्याला तो अधिकारीच जबाबदार असेल आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले आहे. या बैठकीत केवळ प्रमाणपत्रांवरच नव्हे, तर ‘महाज्योती'ला निधी, ओबीसी वसतिगृहे, विद्यार्थ्यांना उद्योगासाठी सवलती आणि कमी व्याजदराचे कर्ज यांसारख्या ओबीसी समाजाच्या इतर मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली. याविषयीच्या श्वेतपत्रिकेबाबत संपूर्ण माहिती आल्यावरच यावर बोलता येईल असे बावनकुळे यांनी सांगितले.

ओबीसींचा मोर्चा मागे घेण्याचे आवाहन

राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी नियोजित केलेला मोर्चा परत घ्यावा, अशी विनंती आम्ही सर्वांनी शिष्टमंडळाला केली आहे. ओबीसी शिष्टमंडळ आमची विनंती मान्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे, असे बावनकुळे म्हणाले.

 

Comments
Add Comment

Vantara : गुजरातमधून सिंह आणण्यासाठी महापालिकेला वनताराची होणार मदत?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थातच राणीबागेत चार

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२६ रोजी आहे. या

पश्चिम रेल्वेच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त खार रोड स्थानकात ऐतिहासिक प्रदर्शन; 7 नोव्हेंबरपर्यंत रेल्वेचा गौरवशाली प्रवास पाहण्याची संधी

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त खार रोड रेल्वे स्थानकाच्या एलिव्हेटेड डेकवर विशेष

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे अवमूल्यन; कायदा अधिकारी आणि सहायक आयुक्त यांना करणे दाखवा नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी): बोरीवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या

मध्य रेल्वेचे 75 गौरवशाली वर्ष पूर्ण; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दिमाखात साजरी झाली 'हेरिटेज वॉक'

मुंबई: भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची 75 गौरवशाली वर्षे

दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणावर NMMCचा वॉच! नवी मुंबईतील 8 विभागांसाठी हेल्पलाइन जाहीर

नवी मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने (NMMC)