सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या महापूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर ६ राज्यातील २६ काऊंटीतील ६ लाखाहून लोक प्रभावित झाले. संयुक्त राष्ट्राचे मानवतादी व्यवहार समन्वय कार्यालयाने (OCHA) नुकतेच सांगितले की, १६ काऊंटीमधील जवळपास १ लाख ७५ हजार लोक महापूरापासून वाचण्यासाठी उंच ठिकाणावर आसरा घेऊन आहेत. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, मलेरिया, श्वसनाचा संसर्ग आणि अतिसाराची प्रकरणे वाढत असून तेथील आरोग्यविषयक धोके वाढत आहेत. धक्कादायक म्हणजे ७७ लाख लोक उपासमारीचा सामना करत असल्याचे समोर आले असून लाखो मुलांना कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर OCHA कडून पूर परिस्थितीवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. सेव्ह द चिल्ड्रनने जलजन्य आजार आणि सर्पदंशाची प्रकरणे वाढत असल्याची माहिती दिली आहे. ज्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहे. दक्षिण सुदानमध्ये उपासमारीचे संकट अजून वाढत असून जगातील सर्वात गंभीर संकट आहे.

संचालकांनी सांगितले की, दक्षिण सुदानमध्ये भविष्यात जे होऊ शकते ते मुलांसाठी धोकादायक असू शकते. मुसळधार पावसा अगोदरच अनेक शहरे जलमय झाली आहेत. ते पुढे म्हणाले की मदतीमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे चॅरिटीच्या कामावर परिणाम झाला आहे. मदतीत तब्बल ३१ लाख अमेरिकन डॉलरची कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे पोषण आणि बाल संरक्षण कार्यक्रमांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. ते म्हणाले की, समुदायाने शेतजमीन, उपजीविका, घरे, शाळा आणि आरोग्य सुविधांपर्यंतची पोहच गमावली आहे. वाढत्या पाण्याच्या स्तरामुळे ३,७९.००० मुले आणि प्रौढ स्थलांतरित झाले आहेत. संकटाच्या या काळात देशात अन्नटंचाई निर्माण झाली आहे. ७७ लाख लोक उपासमारीचा सामना करत आहेत तर ५ वर्षांची २३ लाख मुलांना कुपोषणाचा धोका आहे.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.