गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत जुळ्या बोगद्याच्या कामासाठी अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्र दाखल झाले आहे. बोगदा खोदणाऱ्या संयंत्राचे सुटे भाग जपानहून आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या टीबीएमचे भाग डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत लॉन्चिंग शाफ्ट खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत साडेतीन मीटर खोल शाफ्ट खोदण्यात आला असून प्रत्यक्ष या जुळ्या बोगद्याच्या कामाला नवीन वर्षापासून सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ (ब) मधील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील जुळे बोगदे प्रकल्प स्थळ तसेच मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्प स्थळास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, पॅकेज ए, बी आणि सी, डी आणि इ अंतर्गत होऊ घातलेल्या कामकाजाची पाहणी केली. उपायुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रकल्प सल्लागार या पाहणी दौऱ्यास उपस्थित होते.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत रस्ता संरेखनाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर गगराणी यांनी चर्चा केली. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर आहे. हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. सर्व बाबींची सविस्तर माहिती महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी घेतली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.

मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पांतर्गत चारकोप स्थळास प्रत्यक्ष भेट दिली. तसेच, पॅकेज बी, सी, डी आणि इ अंतर्गत होऊ घातलेल्या कामकाजाची पाहणी केली. याशिवाय पश्चिम उपनगरातील मालाड मरिना एन्क्लेव्ह, चारकोप येथील सेक्टर ८, गोराई क्षेपणभूमी, गोराई खाडी परिसर, एक्सर मेट्रो स्थानक परिसर, कांदळपाडा मेट्रो स्थानक परिसर, दहिसर (पश्चिम) येथील आनंद पार्क या ठिकाणांवरील कामांचा त्यांनी आढावा घेतला. विशेषतः सुटे भाग निर्मितीकरिता जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे पोहोच रस्ते यांची सविस्तर माहीत गगराणी यांनी घेतली.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने