दाऊदच्या जवळच्या माणसावर ईडीच्या धाडी


मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम मुंबईतून परदेशी पळून गेला त्याला काही दशकं उलटली. पण वेगवेगळ्या माणसांकरवी दाऊद मुंबईसह देशभर आजही काळेधंदे करत आहे. भारतातून त्याची आर्थिक उलाढाल आजही सुरू आहे. अनेक अवैध व्यवसायांमध्ये दाऊदशी संबंधित व्यक्ती गुंतल्या आहेत. ड्रग्ज रॅकेटमध्येही दाऊद इब्राहिमचे निकटवर्तीय म्हणून ओळखळले जाणारे अनेक गुंड सक्रीय आहेत. यातलाच एक असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सलीम डोला याच्या नेटवर्कवर ईडीने धाडी टाकायला सुरुवात केली आहे. आज सकाळीच म्हणजे बुधवार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळपासूनच ईडीने त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.


ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत मुंबईतील आठ ठिकाणी धाडी टाकल्या. सलीम डोला याच्यासाठी काम करत असलेल्या फैसल जावेद शेख आणि अल्फिया फैसल शेख यांचे आर्थिक स्रोतांचा शोध सुरू आहे. ड्रग्ज तस्करीतून येणारे पैसे कसे फिरवले जातात हे पण तपासण्याचे काम सुरू आहे. एमडी या ड्रगसाठी फैसल जावेद शेख मागील काही दिवसांपासून सलीमच्या संपर्कात होता. या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी साध्या वेशातील माणसं कामाला लावली. फैसलच्या माणसांवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. यानंतर धाड टाकण्यात आली.


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने फैसल जावेद शेखची अचूक माहिती देणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचे जाही केले आहे. याआधी जून २०२५ मध्येच सलीम डोलाच्या मुलाला दुबईतून हद्दपार करण्यात आले. त्याच्यावरही ड्रग तस्करीचा आरोप आहे. पार्श्वभूमीवर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला महत्त्व आले आहे. या कावाईद्वारे अप्रत्यक्षपणे दाऊद इब्राहिमच्या आर्थिक नाड्या आवळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण