पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२००८ च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. शिवसेना-उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे नुकतीच निर्णायक बैठक झाल्याची माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी दिली. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००४ पासून ‘जुनी पेन्शन’ योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना चालू केली होती. त्याच धर्तीवर प्रथम राज्य शासनाने व नंतर मुंबई महापालिकेने अनुक्रमे १ नोव्हेंबर २००५ व ५ मे २००८ पासून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने