महामुंबईची भटकंती आता एकाच तिकिटावर


एकाच 'मुंबई वन'ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट


मुंबई : मुंबईसह उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि ऐतिहासिक सुविधा सुरू होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात प्रवास करणाऱ्यांना आता बस, मेट्रो, लोकल आणि मोनोरेलसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची गरज राहणार नाही. महामुंबईची भटकंती आता एकाच तिकिटावर करता येणार आहे. ‘मुंबई वन’ असे या ऑनलाइन तिकीट ॲपचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी या ॲपचे उद्घाटन झाले आहे.


आतापर्यंत प्रवाशांना बस, मेट्रो, लोकल आणि मोनोरेल यासाठी स्वतंत्र म्हणजेच वेगवेगळी तिकिटे काढावी लागत होती. मात्र आता ‘मुंबई वन’ ॲपच्या मदतीने संपूर्ण महामुंबई क्षेत्रात एका डिजिटल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. या ॲपमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या भागांचा समावेश आहे. वसई-विरार, पालघर आणि कल्याणपुढील भाग यातून वगळण्यात आला आहे. या ॲपमुळे ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटर उपनगरीय रेल्वेसह एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील.


मुंबई वन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मुंबईतील विविध सार्वजनिक परिवहन यंत्रणांसाठी (पीटीओ) ऑन-डिमांड परिवहन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. मल्टी-मोडल मोबिलिटी मॅनेजमेंट प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी सर्वत्र उपलब्ध असलेल्या डिजिटल सुविधा मिळतात. हे ॲप प्रवाशांना त्यांच्या नियोजित प्रवासासंबंधी महत्त्वाच्या अद्यतनांची रिअल-टाईम सूचना प्रदान करते, ज्यामध्ये पर्यायी मार्गांची माहितीही समाविष्ट असते. अशी माहिती आधीच मिळाल्याने प्रवाशांना योग्य निर्णय घेता येतात आणि आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येते. मुंबई वन अॅप ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून डाउनलोड व वापरासाठी उपलब्ध असणार आहे



आता या भागासाठी एकच तिकीट पुरेसे ठरणार


उपनगरीय लोकल ट्रेन सेवा, बेस्ट, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर महापालिकांच्या बससेवा, मेट्रो लाईन १, २ए,, ७, ३, मोनोरेल सेवा (चेंबूर ते सात रस्ता) आणि नवी मुंबई मेट्रो.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने