बुद्धीला चालना


जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आपण घेतलेल्या विषयांपैकी परमेश्वर हा विषय, मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, मानवी जीवनांत ज्या सगळ्या समस्या, प्रश्न, अडचणी, आपत्ती जे काही अनिष्ट आहे ते निर्माण होण्याचे मुख्य कारण देवाबद्दलचे, परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे आहे. हे माझे विधान काही नास्तिक लोकांना पटणार नाही. मात्र प्रत्यक्षात देव मानणे व न मानणे याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. मृगजळ हे पाहिल्यावर हरीण धावत सुटते. त्याला वाटते की तिथे पाणी आहे. हरणाची जी अवस्था आहे तीच आज माणसाची अवस्था आहे. हरणाला तिथे पाणी नाही हे कळत नाही तसे माणसाचे झालेले आहे. तिथे पाणी नाही हे जर माणसाकडेसुद्धा बुद्धी असेल तरच त्याला कळेल. नास्तिक लोकांना मुळात देव म्हणजे काय हे माहीत नाही, देवाचे रूप काय, देवाचे स्वरूप काय हे माहीत नाही तरीही ते देव नाही म्हणतात. कारण देव नाही हे म्हणणे सोपे जाते. बहुतांशी जे “आम्ही देव मानतो’’ असे म्हणतात त्यांनाही देव माहीत नसतो व कळलेलाही नसतो. मग उमजणे तर दूरच.


देव मानतो किंवा देव मानत नाही यापेक्षा आमचे म्हणणे वेगळेच आहे. देव आहे किंवा नाही हा चर्चेचा अथवा वादाचा विषयच नाही. ज्या गोष्टी आपल्या अनुभवाला येतात त्या नाही कशा म्हणायच्या? असे असतानासुद्धा ज्या गोष्टी कुणालाही अनुभवता येतील पण अनुभव घ्यायचाच नसेल तर त्याला कोण काय करणार? देव आहे की नाही हा मानण्याचा विषय नाही, तो कल्पनेचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे.


“ अनुभवाचिये जोगे नोहे बोला ऐसे’’


हवा हा अनुभवण्याचा विषय आहे. हवा दाखव म्हटले किंवा हवा चाखायची आहे म्हटली तर कशी चाखणार? हवा ऐकायची आहे म्हटले तर कशी ऐकणार? हवा आहे की नाही हे नाक व तोंड दाब मग तुला कळेल. तसेच देवाच्या बाबतीत आहे. वस्तुस्थिती नाकारायची किंवा स्वीकारायची, माणसाने पाहिजेत ते करावे पण वस्तुस्तिथी ही मात्र तशीच राहते. मृगजवळच्या ठिकाणी पाणी नसते पण हरणाला ते पाणी आहे असे वाटत असते. तसे जगात परमेश्वर दिसत नाही म्हणून तो नाही असे म्हणता येणार नाही. ज्याच्याजवळ बुद्धी आहे, जो बुद्धीला चालना देतो, त्याच्याजवळ विचार करण्याची शक्ती आहे तो तसा विचार करणार नाही. त्याला परमेश्वराचे रूप व स्वरूप आकळण्याची शक्ती येते.


Comments
Add Comment

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची