म्हाडाला अर्जाच्या विक्रीतून मिळाले ८ कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या कोकण मंडळांच्या घरांसाठी येत्या शनिवारी दि. ११ ऑक्टोबरला ठाण्यामध्ये संगणकीय सोडत होणार आहे. मात्र या सोडतीपूर्वीच म्हाडा मालामाल झाली आहे. केवळ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने तब्बल ८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. तसेच शासनालादेखील जीएसटीच्या माध्यमातून १ कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.


म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३५४ घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सोडतीसाठी एकूण १ लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले असून अनामत रकमेसह १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह भरलेले अर्ज सोडतीसाठी पात्र ठरतात. घरांसाठी अर्ज भरताना म्हाडा अर्जदाराकडून अनामत रकमेसह ५९० रुपये चार्ज आकारते. यात ५०० रुपये अर्ज शुल्क आणि ९० रुपये जीएसटीचा समावेश असतो. अर्ज शुल्काचे ५०० रुपये म्हाडाला मिळतात. अशा प्रकारे १लाख ५८ हजार ४२४ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने ७ कोटी ९२ लाखांची कमाई केली आहे.


तसेच प्रतिअर्ज ९० रुपये जीएसटीच्या माध्यमातून १ कोटी ४२ लाख ५८ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. म्हाडाकडून अत्यल्प उत्पन्न गटाच्या अर्जदाराकडून ५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटाकडून १० हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटाकडून १५ हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटाकडून २० हजार रुपये आकारले जातात. अशा प्रकारे अनामत रकमेतून म्हाडाच्या तिजोरीत दीडशे कोटी रुपये जमा झाले आहेत. लॉटरीत अयशस्वी झालेल्या अर्जदारांना अर्ज शुल्क वगळून अनामत रक्कम परत केली जाते तर यशस्वी अर्जदारांच्या फ्लॅटच्या किमतीमधून अनामत रक्कम वजा केली जाते.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.