मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात वाहून गेलं. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.


बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून ३३ जिल्ह्यातील, ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर वरील क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव - पाटील यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंती अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभागातर्फे नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले आहे. मागील सात दिवसात सुमारे ५ हजार कोटीवर निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सुमारे सात हजार ५०० कोटीची मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे.


या निर्णयामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी व्यक्त केला आहे. नागपूर विभागातील तीन लाख ७६ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या ३ लाख ४४ हजार ६२९. २४ हेक्टर बाधित क्षेत्रातील ३४० कोटी ९० लाख ८ हजार निधीचा समावेश आहे.


नागपूर विभाग


तीन लाख ७६ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या तीन लाख ४४ हजार ६२९. ३४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३४० कोटी ९० लाख ८ हजार निधी


नागपूर : एक लाख २ हजार ८५० शेतकऱ्यांच्या ८५ हजार ६४१. ८८ हेक्टर क्षेत्रासाठी ११२ कोटी ३७ लाख रुपये


चंद्रपूर : ९३ हजार ८९५ शेतकरयांच्या ८१ हजार ७२६. ८० हेक्टर शेत्रास्तही ६९ कोटी ४६ लाख ८६ हजार रुपये


वर्धा :१ लाख शेकऱ्यांच्या ४९ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या १ लाख ६७ हजार ४७६.९६ हेक्टर क्षेत्रासाठी १४२ कोटी ४० लाख ११ हजार रुपये.


भंडारा- १८ हजार ९५३ शेतकऱ्यांच्या ६ हजार ४२५.४१ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी ४८ लाख ३६ हजार रुपये


गोंदिया- सहा हजार ३९८ शेतकऱ्यांच्या दोन हजार ३०९.४६ हेक्टर क्षेत्रासाठी तीन कोटी ५० लाख २१ हजार रुपये. व


गडचिरोली- पाच हजार ३२६ शेतकऱ्यांच्या एक हजार ४८.८३ हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी ६७ लाख ५४ हजार रुपये.


अमरावती : विभागातील चार लाख ७८ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ८८२.७४ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ कोटी ४ लाख ५१ हजार रुपये.


यवतमाळ : २ लाख २१ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ७ हजार ६२३. ४३ हेक्टर क्षेत्रासाठी २६२ कोटी ८ लाख हजार रुपये


पुणे : विभागातील ८ लाख २५ हजार १८९ शेतकऱ्यांच्या सात लाख ९ हजार क्षेत्रासाठी २६२ कोटी ८ लाख ४५ हजार रुपये


सातारा - ३ हजार ३८८ शेतकऱ्यांच्या १ हजार ५६२. ६७ हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी ४९ लाख ५ हजार रुपये


सोलापूर : ६ लाख ७८ हजार ५९२ शेतकऱ्यांच्या पाच लाख ३८ हजार ८८९. हेक्टर क्षेत्रासाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये


पुणे- ५२ हजार ७८९ शेतकऱ्यांच्या २१ हजार ९५१.९४ हेक्टर क्षेत्रासाठी ३४ कोटी ४२ लाख ८७ हजार रुपये.


सांगली - ९० हजार ४२० शेतकऱ्यांच्या एक लाख ४६ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रासाठी १४२ कोटी ३५ लाख रुपये



नाशिक विभाग


१५ लाख ७९ हजार २३९ शेतकऱ्यांच्या ११ लाख ५० हजार ३०१. ७६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४७४ कोटी ८४ लाख ९ हजार


नाशिक - चार लाख नऊ हजार ७४७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८८ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रासाठी ३१७ कोटी १५ लाख ७७ हजार रुपये


धुळे : १६ हजार ३५७ शेतकऱ्यांच्या ११ हजार ५९४. ९ हेक्टर क्षेत्रातील १० कोटी २२ लाख ९७ हजार कोटी


नंदुरबार : ९३१ शेतकऱ्यांच्या ४४५. ०६ हेक्टर क्षेत्रासाठी ५३ लाख ९९ हजार


जळगाव : ३ लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांच्या २ लाख ४७ हजार २६२.०१ हेक्टर क्षेत्रासाठी २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रुपये


अहिल्यानगर : ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांच्या सहा लाख २ हजार १९४. हेक्टर क्षेत्रासाठी ८४६ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपये



कोकण विभाग


१ लाख ५ हजार २३९ हजार शेतकऱ्यांच्या २९ हजार २३३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रातील २८ कोटी १० लाख ६३ हजार निधी


ठाणे : ३५ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या नऊ हजार ४८० . ११ हेक्टर क्षेत्रासाठी ८ कोटी ३७ लाख ६५ हजार रुपये


पालघर : ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ७४४. २३ हेक्टर क्षेत्रासाठी १४ कोटी ४२ लाख ६५ हजार


रायगड : १८ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या ५ हजार ८२९. ४६ हेक्टर क्षेत्रासाठी ५ कोटी नऊ लाख ९ हजार


रत्नागिरी : १ हजार १५३ शेतकऱ्यांच्या १०३.८८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ लाख ५३ हजार रुपये

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.