अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी दीपिका पदुकोणने हा मुद्दा सर्वांसमोर मांडला होता. त्यावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातच आता बॉलीवूड अभिनेत्री काजोल हिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या शो च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आलिया आणि वरुण धवन पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रमात गप्पा सुरू असताना ९ ते ५ नोकरी करणारे कलाकारांपेक्षा कमी काम करतात असे वादग्रस्त वक्तव्य काजोलने केले.

काजोलच्या या विधानामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झाली असून यूझर्सने तीव्र शब्दात टीका केली आहे. काजोलने यावर स्पष्टीकरण दिले कि ९ ते ५ नोकरी करणारे कामाच्यामध्ये ब्रेक घेऊ शकतात, थोडा आराम करू शकतात, चहासाठी ब्रेक घेऊ शकतात. मात्र कलाकारांना हे स्वातंत्र्य नसत. शूटिंग दरम्यान त्यांना अंदाजे १२ ते १४ तास त्यांचे १०० टक्के द्यावे लागतात.

कलाकारांना येणारी आव्हाने

एका मुलाखतीत काजोलने तिच्या कामाचे वर्णन केले होते. ती म्हणाली हे खूप बारकाईने आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करुन करायेच काम आहे. जेव्हा तुम्ही शूटिंग करत असता तेव्हा तुम्हाला तुमचे १०० टक्के योगदानवं लागतं. आम्ही द ट्रायल सीझन २ साठी सलग ३५ ते ४० दिवस शूटिंग केले. तुम्हाला व्यायाम करावा लागतो. योग्य तो आहार घ्यावा लागतो. तुमच्या शरीराची देखभाल करावी लागते. कारण तुमच्या शरीरातला थोडासा तरी बदल तुमचा लूक आणि पोशाखावर परिणाम करू शकतो. आणि हे काम खूप दबावाचे आहे.

अभिनयाची कॉर्पोरेट नोकरदारांशी तुलना करताना, काजोलने असेही सांगितले की, कलाकारांना ऑफिस कर्मचाऱ्यांप्रमाणे आराम करण्यासाठी वेळ मिळत नाही. जेव्हा तुम्ही ९ ते ५ च्या शिफ्टमध्ये काम करता तेव्हा तुम्ही चहाचा ब्रेक घेऊ शकता. किंवा थोडा आराम करू शकता. आम्ही ते करू शकत नाही. आमच्यावर सतत लक्ष ठेवले जाते. आम्ही कसे बसतो. आम्ही आमचे पाय कसे वाकवतो. आम्ही कसे हसतो किंवा हालचाल करतो. सर्वकाही प्रत्येक क्षणाची तपासणी केली जाते. आम्ही अशा प्रकारे जीवन जगतो.

शोमध्ये उपस्थित आलिया भट वरूण धवन आणि ट्विंकलने मात्र काजोलचे म्हणणे अमान्य केले. आलियाने म्हटले कि प्रत्येक जण समान मेहनत करत असतो. आपण त्यांचे काम करत नाही म्हणू आपल्याला समजत नाही पण ९ to ५ शिफ्ट करणारे सुद्धा आपल्या इतकीच मेहनत करत असतात.

काजोल "सरजमीन" आणि "मा" मध्ये काम

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काजोलने २०२५ मध्ये "मा" या हॉरर चित्रपटात काम केले. ती जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित झालेल्या इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत "सरजामीन" मध्ये देखील दिसली. सध्या काजोल ट्विंकल खन्ना सोबत " टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" हा टॉक शो होस्ट करत आहे. हा शो अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’