पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका, अफगाणिस्तानच्या "या" निर्णयाला भारताचा पाठिंबा

काबुल : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानला धक्का दिला . आता अफगाणिस्तानने देखील असाच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या दिशेने वाहणारी नदी म्हणजे कुनार नदी. या नदीवर अफगाणिस्तानने धरण बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय पाकिस्तानचे टेन्शन वाढवणारा आहे. अफगाणिस्तानच्या निर्णयाला भारताने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. आपण अफगाणिस्तानच्या जलविद्युत प्रकल्पांसह शाश्वत जलव्यस्थापनेसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, असे भारताने जाहीर केले आहे. या संदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, हेरत प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अश्या मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत असणार आहे यात काही शंका नाही.


अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या उत्तर - पश्चिम अर्थात वायव्य भागात वाहणाऱ्या कुनार नदीवर धारण बांधण्याची घोषणा केली आहे. हे धरण उभारण्यात आल्यास पाकिस्तानात वाहणाऱ्या कुनार नदीच्या पाण्याच्या प्रवाहवर मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारताने घेतलेला सिंधू करार स्थगित निर्णय आणि आता हा अफगाणिस्तानचा निर्णय यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत .


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमेवर ठिकठिकाणी हुशारीने हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे नुकसान झाले. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानला चर्चेसाठी बोलावले. पण ही चर्चा अयशस्वी झाली. यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर भारताने विकासाकरिता अफगाणिस्तानला पाठिंबा आणि दहशतवादाला मदत देणाऱ्या पाकिस्तानला विरोध अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानला त्यांच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. तो त्यांचा अधिकारही आहे; अशी भूमिका भारताने जाहीररित्या घेतली आहे. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे.


कुनार नदी विषयी


कुनार नदी सुमारे ४८० किलोमीटर लांबीची असून ती अफगाणिस्तानच्या पूर्वेकडून पाकिस्तानच्या उत्तर- पश्चिम अर्थात वायव्य भागात वाहते, ही नदी हिंदुकुश पर्वतरांगेतून आणि अफगाणिस्तानमधील कुनार खोऱ्यातून पुढे दक्षिण दिशेला वाहते.

Comments
Add Comment

Saudi Arabia Flights : सौदी अरेबियासाठी विमान प्रवासावर निर्बंध; एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअरची उड्डाणे स्थगित, प्रवाशांना परताव्याचा पर्याय

Saudi Arabia Flights : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या काही विमानसेवा

Philippines Air Crash: दोन लष्करी विमानांचा अपघात, चार वैमानिकांचा मृत्यू

मनिला: फिलिपिन्समध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील हवाई तळावर नियमित प्रशिक्षण

टर्कीच्या खाणीत थरकाप उडवणारा स्फोट! काळजात धस्स आणणाऱ्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू, अजूनही एक जण आतच अडकले

अंकारा: टर्कीच्या उत्तर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. काळ्या

Champi Cyclone: तैवानमध्ये ‘चांपी’ चक्रीवादळाचा हाहाकार; शाळा-कार्यालये बंद, शेकडो उड्डाणे रद्द!

ताइपे: तैवानमध्ये 'चांपी' चक्रीवादळाने धडक देण्यापूर्वीच हाहाकार माजवला आहे. ताशी 170 किलोमीटर वेगाने वाहणारे

Tibet Earthquake : तिबेटमध्ये 7.0 तीव्रतेचा भूकंप; 16 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक घरं कोसळली

International News: भारताच्या सीमेलगत असलेल्या तिबेटमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर

US Russia Relations: पुतिन यांनी सोडला 74 वर्षीय अमेरिकन नागरिक! ट्रम्प यांच्या एका फोन कॉलने रचला इतिहास, पाहा काय घडलं मागे?

वॉशिंग्टन : रशियाने 74 वर्षीय अमेरिकन नागरिक स्टीफन हबर्ड यांची तुरुंगातून कोणतीही अदलाबदली न करता सुटका केली