वंदे मातरम् गीताच्या कार्यक्रमाकरता भाजपकडून अबू आझमी यांना निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त मुंबई भाजप तर्फे मुंबईमध्ये शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त सहा ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यातील ईशान्य मुंबईतील कार्यक्रम मानखुर्द पी एम जी पी कॉलनीत होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना दिले आहे.


भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आझमी यांना पत्र पाठवून या कार्यक्रमाला निमंत्रित राहण्याचे कळवले आहे. साटम यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, शुक्रवारी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रगीत "वंदे मातरम्" या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वंदे मातरम् गीताच्या कथनाचा एक विशेष कार्यक्रम आपल्याच घराजवळच सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.


वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत देशभक्ती, एकता आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. आपण सुद्धा या गीताचे कथन व गायन आमच्यासोबत करावे, या करिता सदर कार्यक्रमाला मी आपणास निमंत्रित करत आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून वंदे मातरम् कथनामध्ये सहभागी व्हाल, अशी अपेक्षा आहे,असे म्हटले आहे.



अबू आझमी यांनी वंदे मातरम् गीत शाळांमध्ये म्हणण्यास जाहीर विरोध केला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना निमंत्रित केल्याचे बोलले जात आहे .

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने