बीकेसीच्या धर्तीवर वडाळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र

एमएमआरडीए करणार १५० एकर जागेचा विकास

मुंबई  : वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार येथील भूखंडांचा ई लिलाव करून येथे व्यावसायिक आणि काही प्रमाणात निवासी संकुले उभारण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीला अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. वडाळ्यातील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. हा भूखंडाचे क्षेत्रफळ १०८६० चौरस मीटर असून या भूखंडावरील अनुज्ञेय बांधकाम १,०८,६०० चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. पात्र निविदाकाराला या भूखंडाचे ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे.

एमएमआरडीए वडाळा येथील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली. १०८६० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला जाणार असून या ई लिलावातून एमएमआरडीएला किमान १६२९ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारने चार महानगरांचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एमएमआर क्षेत्राचा समावेश आहे.

१५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव :


निविदेनुसार या भूखंडाच्या ई लिलावासाठी १,५०,००० रुपये प्रति चौरस मीटर असे राखीव दर निश्चित करण्यात आले आहेत. या राखीव दरानुसार एमएमआरडीएला या भूखंडाच्या ई लिलावातून किमान १६२९ कोटी रुपये इतका महसूल मिळणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएने २००८ मध्ये वडाळ्यातील दोन भूखंडांच्या ई लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र आर्थिक मंदीमुळे या ई लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने २०१० मध्ये याच भूखंडांसाठी पुन्हा ई निविदा काढल्या आणि त्यास प्रतिसाद मिळाला. लोढा समूहाने ४०५३ कोटी रुपयांत भूखंड खरेदी केले आणि त्यावर न्यू कफ परेड नावाने टाऊनशीप उभारली. आता १५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव करण्यात येणार आहे.

वडाळ्यातील भुखंड विक्रीमुळे एमएमआरडीए होणार मालामाल, ई-लिलावातून १६०० कोटींहून अधिकचा महसूल मिळणार,  भुखंड विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध , व्यावसायिक आणि निवासी संकुले उभारण्यात येणार
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने