पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा 'शिक्कामोर्तब' भारताचे अर्थकारण जगात 'टॉप',अर्थव्यवस्था सर्वात वेगवान ६.५% वेगाने वाढणार - मूडीज अहवाल

मोहित सोमण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती वेगाने होत आहे का हा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. 'मूडीज' (Moody's) या जागतिक दर्जाच्या नामांकित संस्थेने भारताच्या अर्थकारणाविषयी आपल्या अहवालातील निष्कर्षात भारताचा जयजयकार केला आहे. कारण संस्थेच्या ग्लोबल मायक्रो आऊटलूक २०२६-२७ या अहवालात भारताची अर्थव्यवस्था अडथळे आले तरी ६.५% वेगाने मार्गक्रमण करणार असा निष्कर्ष अधोरेखित केला आहे. तसेच जी २० (G20) देशांतर्गत भारत हा सर्वाधिक वेगवान वाढणारा देश ठरेल असे अहवालात नमूद केले गेले आहे.


इतकेच नाही तर संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की,' भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने वाढलेल्या मूलभूत सुविधा (Infrastructure),वाढलेली ग्राहकांची मागणी, निर्यातीतील वाढवलेले प्रयत्न व उपक्रम यासह खाजगी उद्योगांकडून झालेली भांडवली गुंतवणूक या मुद्यांच्या आधारे भारत आपल्या अर्थव्यवस्थेत वेगाने प्रगती करत आहे ' असे म्हटले आहे.


जागतिक स्तरावरील अडचणी आणि काही निर्यातीवर अमेरिकेने लावलेल्या उच्च कर असूनही भारताची आर्थिक कामगिरी स्थिर राहिली आहे, असे मूडीजने नमूद केले आहे. 'काही उत्पादनांवर ५०% अमेरिकन करांचा सामना करणाऱ्या भारतीय निर्यातदारांना निर्यात पुनर्निर्देशित करण्यात यश आले आहे, अमेरिकेला होणारी निर्यात ११.९% कमी झाली असली तरी सप्टेंबरमध्ये त्यांची एकूण निर्यात ६.७५% वाढली आहे अशा शब्दांत आपला निष्कर्ष संस्थेने नोंदवला आहे असे अहवालात म्हटले आहे.


याशिवाय संस्थेने भारताच्या स्थिरतेचे श्रेय तटस्थ ते सुलभ चलनविषयक पतधोरण आणि कमी चलनवाढीला दिलेले आहे ज्यामुळे देशांतर्गत परिस्थिती विकासाला आधार देत आहे असे मूडीजने म्हटले आहे. 'भारतात, आरबीआयने ऑक्टोबरमध्ये आपला रेपो दर स्थिर ठेवला ज्यामुळे ते महागाई कमी आणि वाढ मजबूत असताना धोरणांवर सावध असल्याचे दिसून येते' अशा नेमक्या शब्दात संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. सकारात्मक गुंतवणूकदारांच्या भावनेमुळे चालणाऱ्या मजबूत आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहामुळे जागतिक म्हणजेच (बाह्य धक्के) कमी होण्यास आणि बाजारात तरलता राखण्यास मदत झाली आहे असेही मूडीजने पुढे म्हटले आहे.


मूडीजने २०२६ आणि २०२७ दरम्यान जागतिक जीडीपी वाढ सुमारे २.५%-२.६% राहण्याचा अंदाज संस्थेने वर्तवला आहे जो संपूर्ण प्रदेशांमध्ये स्थिर परंतु असमान विस्तार दर्शवितो. प्रगत अर्थव्यवस्था सुमारे १.५% वाढण्याची अपेक्षा आहे तर भारताच्या नेतृत्वाखालील उदयोन्मुख बाजारपेठा सुमारे ४% वाढतील. अहवालात म्हटले आहे की, 'धोरणातील फरक आणि व्यापारातील बदल स्थिर परंतु मिश्र जागतिक वाढीचा दृष्टिकोन तयार करतील कारण अर्थव्यवस्था महामारीनंतरच्या आणि भूराजकीय पुनर्रचनांशी जुळवून घेतात.' असे संस्थेने म्हटले.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली