डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकतेचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम डिजिटल व्यवसाय क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमात डिजिटल धोरणे आणि उद्योजकीय उपक्रमांवर भर दिला जातो. प्रत्यक्ष अनुभवासाठी थेट सत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाते. प्रकल्प कार्यावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू नेटवर्किंग असून, व्यावसायिकांशी सहकार्य आणि संपर्क साधण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे करिअरच्या संधी वाढतात. या अभ्यासक्रमाद्वारे सतत बदलणाऱ्या डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान केली जातात. या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाद्वारे डिजिटल युगातील व्यवसायांसाठी धोरणे विकसित करून अमलात आणण्याची क्षमता प्राप्त करणे शक्य होते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानांची माहिती मिळवता येते. व्यवसाय संधी आणि व्यवसाय वाढीस चालना देणारे निर्णय घेण्यास सक्षम केले जाते.
हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणावर भर देतो. वास्तवात व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाऊन नावीन्यपूर्ण उपाययोजना विकसित करणे शक्य होऊ शकते. व्यवसायाच्या यशासाठी विश्लेषणात्मक साधने आणि तंत्रांचा उपयोग करणे शक्य होते.

अर्हता :

कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी किंवा समतूल्य पात्रता (खुला प्रवर्ग, नॉन क्रिमिलेअर ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान ६०% गुण किंवा समतूल्य एकूण ग्रेड पॉइंट सरासरी (सीजीपीए) आवश्यक. एसस्सी, एसटी, दिव्यांग उमेदवार-किमान
५५% गुण किंवा समतुल्य सीजीपीए आवश्यक.
प्रवेश प्रकिया :
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील चाळणी परीक्षांमधील गुण ग्राह्य
धरले जातात.
(१) खुला संवर्ग : आयआयएमबी - डीबीइ एन्ट्रन्स टेस्ट - किमान ५०% गुण किंवा
(२) सीयुइटी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) : जीएटी (जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट) - किमान ७०% गुण
(३) जेईई मेन किमान ५०% गुण. जे उमेदवार एकापेक्षा अधिक प्रवेश परीक्षांचे गुण सादर
करतात, त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येतात.

संपर्क : https: //dbe.iimb.ac.in/जिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकतेचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम डिजिटल व्यवसाय क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमात डिजिटल धोरणे आणि उद्योजकीय उपक्रमांवर भर दिला जातो. प्रत्यक्ष अनुभवासाठी थेट सत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाते. प्रकल्प कार्यावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू नेटवर्किंग असून, व्यावसायिकांशी सहकार्य आणि संपर्क साधण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे करिअरच्या संधी वाढतात. या अभ्यासक्रमाद्वारे सतत बदलणाऱ्या डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान केली जातात. या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाद्वारे डिजिटल युगातील व्यवसायांसाठी धोरणे विकसित करून अमलात आणण्याची क्षमता प्राप्त करणे शक्य होते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानांची माहिती मिळवता येते. व्यवसाय संधी आणि व्यवसाय वाढीस चालना देणारे निर्णय घेण्यास सक्षम केले जाते.
हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणावर भर देतो. वास्तवात व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाऊन नावीन्यपूर्ण उपाययोजना विकसित करणे शक्य होऊ शकते. व्यवसायाच्या यशासाठी विश्लेषणात्मक साधने आणि तंत्रांचा उपयोग करणे शक्य होते.

अर्हता :

कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी किंवा समतूल्य पात्रता (खुला प्रवर्ग, नॉन क्रिमिलेअर ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान ६०% गुण किंवा समतूल्य एकूण ग्रेड पॉइंट सरासरी (सीजीपीए) आवश्यक. एसस्सी, एसटी, दिव्यांग उमेदवार-किमान
५५% गुण किंवा समतुल्य सीजीपीए आवश्यक.
प्रवेश प्रकिया :
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील चाळणी परीक्षांमधील गुण ग्राह्य
धरले जातात.
(१) खुला संवर्ग : आयआयएमबी - डीबीइ एन्ट्रन्स टेस्ट - किमान ५०% गुण किंवा
(२) सीयुइटी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) : जीएटी (जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट) - किमान ७०% गुण
(३) जेईई मेन किमान ५०% गुण. जे उमेदवार एकापेक्षा अधिक प्रवेश परीक्षांचे गुण सादर
करतात, त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येतात.
संपर्क : https://dbe.iimb.ac.in/

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने