ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

नोएडा : जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची मनोभूमिका अधिक उंचावली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच स्थानिक खासदार डॉ. महेश शर्मा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “देश-विदेशात भव्य शिल्पनिर्मिती करून भारताची ओळख जगभर पोहोचवणारे राम सुतार हे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य आणि प्रतिभासंपन्न शिल्पकार आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या जगप्रसिद्ध भव्य शिल्पाची निर्मिती ही त्यांची अद्वितीय कामगिरी आहे. चैत्यभूमीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ या पुतळ्याची निर्मिती ही देखील तेच करत आहेत. जगभरातील इतर स्मारके विविध पुतळे त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक कलाकृती ही अभिमानाची बाब आहे.” ते पुढे म्हणाले, “राम सुतार यांनी शंभर वर्षांचा जीवनप्रवास पूर्ण केला असूनही त्यांची सर्जनशील ऊर्जा अद्याप अटळ आहे. त्यांच्या कार्याचा वारसा ज्येष्ठ शिल्पकार अनिल सुतार समर्थपणे पुढे नेत आहेत.

Comments
Add Comment

Western Railway Megablock: वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; वाचा अपडेट...

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभ मुहूर्त समीप! ध्वजारोहणानंतर होणार सुरूवात, धर्मध्वजाची वैशिष्ट्य जाणून घ्या

[caption id="attachment_1070638" align="aligncenter" width="800"] सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Nashik Kumbhmela : रामकुंडावर पुरोहित संघाच्या ध्वजस्तंभाची परंपरेनुसार प्राणप्रतिष्ठापना संपन्न!

[caption id="attachment_1070623" align="aligncenter" width="800"] नाशिकच्या पवित्र रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा; तपोवनात धर्मध्वज आणि भव्य ग्रामपरिक्रमेने धार्मिक पर्वाचा मंगलमय शुभारंभ

[caption id="attachment_1070611" align="aligncenter" width="800"] भक्तीचा गजर, संत-महंतांचा पावन सहवास, धर्मध्वजाची दिव्य पताका आणि लाखो भाविकांच्या