केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानावर प्रथमच कसोटी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकात्यातील निराशाजनक पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे, तर पहिल्या विजयामुळे आफ्रिकन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.


दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याच्या सलग तीन विकेट्सवरून उद्भवलेल्या “नॉन-हॅटट्रिक” चर्चेला जोर आला आहे. कोलकाता कसोटीत महाराजने भारताचे शेवटचे दोन फलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना दोन सलग चेंडूंवर बाद केले. त्यामुळे गुवाहाटीत तो गोलंदाजीसाठी येताच पहिल्याच चेंडूवर जर त्यांनी विकेट घेतली, तर त्याच्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स पूर्ण होतील. मात्र, हे तांत्रिकदृष्ट्या हॅटट्रिक मानले जाणार नाही, कारण नियमांनुसार एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंवर विकेट घेतल्यावरच हॅटट्रिक मानली जाते. पुढील सामन्यात मिळालेली तिसरी विकेट त्या नियमात बसत नाही. यापूर्वी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध महाराजने टेस्ट हॅटट्रिक नोंदवली आहे.


बारसापारा स्टेडियम कसोटी क्रिकेटसाठी नवे असल्याने येथील खेळपट्टीचा प्रभाव कसा असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. विकेट फलंदाजांसाठी अनुकूल राहील की स्पिन आणि सीम दोन्ही गोलंदाजांना मदत मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्याच तासात पिच सामन्याची दिशा ठरवू शकेल. मालिकेत १–० ने मागे असलेल्या भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आघाडी कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटच्या गुवाहाटीतील पहिल्या अध्यायाचा निकाल काय येणार, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या कपाळाजवळ कोणती मशिन लावली? फायदे वाचून व्हाल आवाक्

टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय

'मला 2027 चा वर्ल्डकप खेळायचा आहे...', शुभमन गिलचं नाव घेत रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असून आता फक्त वनडे खेळत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत

स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरचा व्हिडिओ व्हायरल; हँडशेक न झाल्याने चर्चांना उधाण, VIDEO पाहून चाहते शॉक

भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 अशी खिशात घालून दणदणीत विजय मिळवला.

IND vs NZ: चौथ्या टी20 सामन्याच्या प्लेइंग 11 मधून वैभव सूर्यवंशीला बाहेर काढा! आर अश्विन असं का म्हणाला?

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे.

श्रेयस अय्यर आणि ऑकलँड मैदान..! न्यूझीलंडला फुटला घाम, काय आहे कनेक्शन जाणून घ्या

[caption id="attachment_1070283" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी20 सामना ऑकलँडच्या ईडन पार्क स्टेडियमवर होणार आहे.

IND vs NZ T20: भारतविरुद्धच्या मालिकेतून न्यूझीलंडचे दोन शिलेदार बाहेर; संघात मोठी उलथापालथ, कोणाला मिळणार संधी?

वेलिंग्टन(न्यूझीलंड): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या रोमांचक टी-20 मालिकेत किवी संघाला एकापाठोपाठ एक