सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती अतिधोकादायक असल्याचे आयआयटी, पवईच्या संरचनात्मक तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या चार इमारती रिकाम्या करुन त्यांचा मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार या चारही इमारतीतील संक्रमण शिबिरांचे गाळे रिकामे करण्याच्या नोटीसा रहिवाशांना बजावण्यात आल्या आहेत. मात्र रहिवाशांनी यास विरोध दर्शवला आहे.

सायन प्रतिक्षानगर म्हाडा संक्रमण शिबिरातील टी-३६, टी-३७, टी-५३ आणि टी-५४ या इमारती धोकादायक असून 'गाळे तात्काळ रिकामी' करण्याचा फ्लेक्सद्वारे जाहीर केल्यानंतर रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या फ्लेक्स मध्ये आयआयटीद्वारे या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून या इमारती राहण्यासाठी धोकादायक असल्याचे फ्लेक्समध्ये नमूद करण्यात आले आहे. अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारचे फ्लेक्स लावून म्हाडाने रहिवाश्यांवर "बिल्डिंग रिकामी करा" असा दबाव टाकत असल्याचा आरोप रहिवाशांमार्फत करण्यात येत आहे.

रहिवाशांच्या मते, इमारती धोकादायक असल्याचे सांगत म्हाडाने फ्लेक्सवरून तात्काळ गाळे रिकामे करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात स्थलांतराची कोणतीही पारदर्शक प्रक्रिया, योग्य बैठक, लेखी हमी किंवा संवाद साधला गेलेला नाही. त्यातच फ्लेक्सवर दिलेले पर्याय; संक्रमण शिबिरातील गाळे किंवा २० हजार रुपये प्रतिमहिना भाडे, हे अपुरे, अव्यवहार्य आणि रहिवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. रहिवाश्यांनी म्हाडाला मागणी केली आहे की, अचानक फ्लेक्स लावून लोकांमध्ये भीती निर्माण करणे थांबवावे. पुनर्विकासाची अधिकृत माहिती, दस्तऐवज, वेळापत्रक व हमीपत्र द्यावे. प्रत्यक्ष सर्वसामान्यांशी चर्चा करून लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावा. दरम्यान म्हाडाच्या निर्णयाविरोधात रहिवाश्यांनी एकजुटीने पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

आयआयटीच्या अहवालानुसार आता म्हाडाच्या उपाध्यक्षांनी या चारही इमारतींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे दुरुस्ती मंडळाने या अतिधोकादायक इमारतीतील २५० ते २७५ रहिवाशांना गाळे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. इतर संक्रमण शिबिरातील गाळे वा महिना २० हजार रुपये घरभाडे असे दोन पर्यायही दुरुस्ती मंडळाने रहिवाशांना दिले आहेत. तेव्हा आता हे गाळे रिकामे करुन पुनर्विकासाचे काम हाती घेण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासह मुंबई मंडळासमोर असेल. दरम्यान दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडून गाळे रिकामे न केल्यास आणि भविष्यात कोणतीही पडझड वा दुर्घटना झाल्यास त्यात जिवितहानी, वित्तहानी झाल्यास दुरुस्ती मंडळ जबाबदार राहणार नाही, असे दुरुस्ती मंडळाने इमारतीबाहेर लावलेल्या आवाहनात नमूद केले आहे
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने