मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दरवर्षी प्रदूषण वाढत असून, यावर्षीही प्रदूषणाचा विळखा कायम राहणार आहे. त्यातच एखाद्या परिसरात सलग तीन दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३०० वर नोंदविला गेला, तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून, तेथील बांधकामे बंद केली जाणार आहेत.

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावलेला असून दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, इथिओपियाच्या ज्वालामुखीच्या राखेचे कण हवेद्वारे वाहून आले असले तरी ते मुंबईवर वाहून आलेले नाहीत. गुजरात, राजस्थानवरील पट्ट्यात त्याचा प्रभाव दिसला. हे राखेचे कण वातावरणात अत्यंत वरच्या उंचीवर होते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत नोंदविण्यात आलेले प्रदूषण ज्वालामुखीच्या राखेच्या कणांचे नाही. मुंबईमधील हवा खराब म्हणजे रोजचे प्रदूषण आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. कारण हवा स्थिर राहते. हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून बांधकामांना नोटीस देण्यापासून प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याची कारवाई सुरू असते. प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू असून, गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे कुलाबा, भायखळा आणि बोरिवलीतील बांधकामे बंद केली होती. यावर्षीही कारवाई सुरूच राहील, असे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक